गरुड कॉम्प्लेक्समधील दुकान फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 10:32 PM2018-12-09T22:32:02+5:302018-12-09T22:32:25+5:30
पावणेपाच लाख रुपये लंपास : पोलिसांनी केली सीसीटीव्ही कॅमेºयाची तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील गरुड कॉम्प्लेक्समधील औषध विक्रीच्या दुकानाचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश करत चोरट्याने ४ लाख ७० हजाराची रोकड लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी उजेडात आली़ याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा शहर पोलिसात नोंदविण्यात आला़
शहरातील गरुड कॉम्प्लेक्समध्ये पहिल्या माळावर एफ ५८ या गाळ्यात साई सिध्दी मेडीकेअर या नावाचे औषधाचे दुकान आहे़ या दुकानातूनच सचिन बडगुजर यांचा ट्रॅव्हर्ल्सचा व्यवसाय सुरु असतो़ त्यांचे वडील गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टर असल्याने त्यांचे उठणे-बसणे या ठिकाणी असते़ त्यांच्याकडील रोकड रक्कम बºयाच वेळा दुकानातील गल्यात ठेवलेली असते़ ८ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास दुकानाच्या गल्यात मेडीकल आणि ट्रॅव्हल्सच्या व्यवसायातून आलेली रोख रक्कम ४ लाख ७० हजार असे दुकानातील गल्यात ठेवून दुकानाचे शटर व्यवस्थितपणे बंद करण्यात आल्यानंतर बडगुजर हे घरी निघून गेले़
रविवारी सकाळी त्यांचा भाऊ राहुल हा दुकान उघडण्यासाठी आला असता दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले़ घटनेची माहिती शहर पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर तातडीने पथक दाखल झाले़ बंद दुकानाच्या शटरचे कुलूप टॉमीच्या मदतीने तोडून शटर उचकविण्यात आले़ दुकानातील गल्यात ठेवण्यात आलेली ४ लाख ७० हजाराची रोकड चोरट्याने चोरुन नेली आहे़
याप्रकरणी मोगलाई परिसरात राहणारे सचिन दिलीप बडगुजर यांनी धुळे शहर पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदविली़ त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुध्द भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे़