शॉर्टसर्किटने घराला आग, लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 10:43 PM2018-11-30T22:43:38+5:302018-11-30T22:44:13+5:30
शिंदखेडा : खलाणे येथील घटना, शेतकºयावर ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी परिस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा/दत्तवायपूर : शिंदखेडा तालुक्यातील खलाणे येथे राहत्या घराला शॉटसर्कीट झाल्याने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. घराला आग लागल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती नुकसानग्रस्त शेतकºयापुढे निर्माण झाली आहे. शासनाने मदत करावी, अशी मागणी होत आहे़
खलाणे येथील साहेबराव गोविंदा अहीरराव (पाटील) यांच्या राहत्या घराला अचानक शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याने कापसाचे पैसे, मुलांचे शैक्षणिक कागदपत्रे, शेतीतील शेंगा, ज्वारी, बाजरी व दाळी, टी.व्ही., फ्रिज आदी संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
आगीचे स्वरूप मोठे असल्याने इतर दुसºया घराना लागू नये यासाठी आग विझविण्यासाठी ग्रामस्थ व पदाधिकाºयांनी शिंदखेडा व दोंडाईचा येथील अग्निशमन दलाच्या इतर मदत करुन आग विझविण्यात आली. आगीची घटना समजताच तलाठी लोंढे यांनी पाहणी करून पंचनामा चा आहवाल तहसीलदार सुदाम महाजन व सर्कल अधिकारी यांच्याकडे पाठविला. तालुक्यात गेल्या तीन ते चार वर्षापासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. त्यात या शेतकरी परिवाराची मोठी हानी झाली आहे. सुमारे १ लाख ९६ हजारांचा कापूस जळून खाक झाला आहे़
शासनाने या परिस्थितीचा गांभीर्य लक्षात घेऊन घटनेचा पंचनामा करून या शेतकरी परिवाराला आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे़ घटनेची शिंदखेडा पोलीसात नोंद झाली आहे़