..तर तंत्रनिकेतनसाठी श्राद्ध घालो आंदोलन

By admin | Published: February 15, 2017 12:04 AM2017-02-15T00:04:29+5:302017-02-15T00:04:29+5:30

मनसे विद्यार्थी सेना : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, शासकीय तंत्रनिकेतन बंद निर्णय रद्द करा

Shraddha wala movement for technicolan | ..तर तंत्रनिकेतनसाठी श्राद्ध घालो आंदोलन

..तर तंत्रनिकेतनसाठी श्राद्ध घालो आंदोलन

Next

धुळे : शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्यासंदर्भात शासनाने घेतलेला निर्णय रद्द करावा. यासंदर्भात विद्याथ्र्याशी तत्काळ चर्चा करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शासनाविरुद्ध श्राद्ध घालो आंदोलन करेल, असा इशारा दिला आहे. शासकीय तंत्रनिकेतन सुरू रहावे या मागणीसाठी मनविसेतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
यासंदर्भात जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात कार्यवाहीही सुरू झाली आहे. मात्र या निर्णयाला सर्व विद्यार्थी तसेच संघटनांनी  तीव्र विरोध केला आहे. तरीही शासनाने विद्याथ्र्याची कोणतीही बाजू ऐकून न घेता, विद्यार्थी विरोधी भूमिकेवर ठाम आहे. धुळे शहरात मोठय़ा जागेत असलेले शासकीय तंत्रनिकेतन बंद करून तेथे शासनाने अभियांत्रिकी शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र विद्याथ्र्याची या निर्णयामुळे मोठय़ा प्रमाणात गैरसोय होणार आहे. तसेच या निर्णयाचा खाजगी शैक्षणिक संस्था फायदा होऊन जिल्ह्यातील हुशार व गरीब विद्याथ्र्याची आर्थिक पिळवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासकीय तंत्रनिकेतन येथे मोठय़ा प्रमाणावर जागा उपलब्ध  आहे.
या जागेवर शासन इमारत उभारून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करू शकते. असा निर्णय शासन का घेत नाही? हा प्रश्न विद्याथ्र्याना पडला आहे. शासनाने यासंदर्भात विद्याथ्र्याशी चर्चा करून यामुळे होणा:या नुकसानीची माहिती घ्यावी.
शासनाने पाच दिवसात विद्याथ्र्याशी चर्चा करून शासकीय तंत्रनिकेतन बंदचा निर्णय मागे न घेतल्यास मनविसे शासनाविरुद्ध श्राद्ध घालो आंदोलन करेल व लढा आणखी तीव्र करेल. याची दखल शासनाने घ्यावी.
 यावेळी प्रसाद देशमुख, यश शर्मा, विजय जगताप, राहुल मराठे, कल्पेश महानोर, अभिजित सोनवणे, प्रथमेश पाटील आदी उपस्थित होते.
विद्याथ्र्याच्या न्याय हक्कासाठी युवासेनेचा मोर्चा
 युवासेनेतर्फे 16 रोजी जिल्ह्यातील विद्याथ्र्याच्या न्याय हक्कासाठी, हितासाठी शहरातून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये शासकीय तंत्रनिकेतन बंद करू नये. हजारो विद्याथ्र्याचे होणारे नुकसान लक्षात घेऊन हा निर्णय रद्द करावा. कृषि विद्यापीठ धुळ्यातच व्हावे. शासनाने प्रलंबित ठेवलेला निर्णय तत्काळ मार्गी लावावा. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ उपकेंद्रासाठी देवपूरमधील सव्र्हे नं.111 व 112 मधील जागेचा ठराव शासनाने विखंडित केला आहे. यामुळे हजारो विद्याथ्र्याचे नुकसान होत आहे. उपकेंद्राचा प्रश्न शासनाने तात्काळ मार्गी लावावा.
अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी महाराष्ट्र राज्यात एकच विद्यापीठ करावे. या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
शाळा-कॉलेजात जनजागृती
यासाठी शाळा महाविद्यालयात युवासेनेतर्फे जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी ऐश्वर्या अग्रवाल, संदीप मुळीक, हरीश माळी, मनोज जाधव, अमित खंडेलवाल, जितेंद्र पाटील, नितीन मराठे, स्वप्नील सोनवणे, दीपक देसले आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन हे पदाधिकारी जनजागृती करीत आहेत.

युवासेनेतर्फे 16 रोजी भव्य मोर्चा
शासकीय तंत्रनिकेतन बंद करू नये. तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध मागण्यांसाठी युवासेनेतर्फे 16 फेब्रुवारी रोजी शहरातून भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. महाजन हायस्कूल येथून मोर्चाची सुरुवात होणार आहे. महाजन हायस्कूल येथे सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी जमून तेथून सायकल व मोटारसायक मोर्चा काढण्यात येणार आहे.
गांधी पुतळा-नगरपट्टी-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-पारोळा रोड मार्गे महानगरपालिका- जिजामाता हायस्कूल येथून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येणार आहे. जिल्हाधिका:यांना शाळा महाविद्यालयातील विद्याथ्र्याच्या हस्ते प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चात विद्यार्थी, विद्यार्थिनी, युवक, पालक, शिक्षकांनी मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा युवा अधिकारी पंकज गोरे यांनी केले आहे.

Web Title: Shraddha wala movement for technicolan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.