राष्ट्रवादीकडून मोदी सरकारचे श्राध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 05:43 PM2017-09-19T17:43:38+5:302017-09-19T17:45:13+5:30

सर्वपित्रीचा मुहुर्त : पेट्रोल, डिझेल, सिलेंडरच्या भाववाढीचा निषेध

The Shradh of Modi Government from NCP | राष्ट्रवादीकडून मोदी सरकारचे श्राध्द

राष्ट्रवादीकडून मोदी सरकारचे श्राध्द

Next
ठळक मुद्देशहरातील आग्रा रोडवरुन निघालेल्या या मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ करण्यात आला़जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी मोदी सरकारचे प्रतिकात्मक श्राध्दही घालण्यात आले़मोदी तेरे राज मे दारु सस्ती महेंगा तेल अशा घोषणा देत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आग्रारोड दणाणून सोडला़

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : पेट्रोल, डिझेल आणि घरगुती वापरावयाचे गॅस सिलेंडरच्या सातत्याने वाढणाºया भाववाढीचा निषेध नोंदवित राष्ट्रवादी काँगे्रसच्यावतीने घोषणाबाजी करण्यात आली़ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी मोदी सरकारचे प्रतिकात्मक श्राध्दही घालण्यात आले़ या अनोख्या आंदोलनामुळे धुळेकरांचे लक्ष वेधले गेले़ 
देश की जनता करे पुकार, नही चाहीये मोदी-फडणवीस सरकाऱ पेट्रोल-डिझेलची दरवाढ करणाºया मोदी सरकारचा धिक्कार असो, मोदी फडणवीस तेरे राज मे जनता हे हाल मे, मोदी तेरे राज मे दारु सस्ती महेंगा तेल अशा घोषणा देत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आग्रारोड दणाणून सोडला़ महात्मा गांधी पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, उपमहापौर उमेर अन्सारी, मोहन नवले, दादा खताळ, भानुदास पारोळेकर, नंदलाल अजळकर, वाल्मिक जाधव, गणेश जाधव, दिलीप भामरे, शिवाजीराव पवार, किशोर चौधरी, नंदू येलमामे, रविंद्र आघाव, संदिप पाकळे, संदिप पाटोळे, गिरीश भामरे, रणजितराजे भोसले, साहेबराव देसाई, अ‍ॅड़ रविंद्र पाटील, शेख इम्रान, सलीम शेख, कुंदन पवार, आऱ बी़ माळी, मुन्ना शितोळे, चंद्रकांत महाजन, महेंद्र शिरसाठ, मयूर कोळी, दिनेश पोतदार, संदिप हजारे, ज्योती पावरा, राधिका ठाकरे, चंद्रकला जाधव, चंद्रकला शिंदे, कल्पना बोरसे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोर्चात सहभागी होते़़ शहरातील आग्रा रोडवरुन निघालेल्या या मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ करण्यात आला़ याठिकाणी विधीवत पूजन करत मोदी सरकारचे श्राध्दही घालण्यात आले़ 
जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले़ सर्वसामान्यांची कंबरडे मोडणारी पेट्रोल, डिझेलची दरवाढ करुन सरकारने नेमके काय सिध्द केले आहे़ युपीएच्या काळात कच्चा तेलाचे भाव ११० प्रति डॉलर होते़ तरीही पेट्रोलचा दर ६० ते ७० रुपयांदरम्यान होता़ आता तर कच्चा तेलाचे दर ३० ते ४० डॉलरवर पोहचले आहे़ असे असताना पेट्रोल ३० रुपये लिटर मिळण्याऐवजी ८० रुपये मिळत आहे़ एक ते दोन महिन्यात पेट्रोल १६ रुपयांनी तर डिझेल ४ रुपये लिटरमागे वाढविण्यात आले आहे़ तसेच एका सिलेंडरमागे ७५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे़ त्यामुळे महागाईचा आलेख उंचावत आहे़ 

Web Title: The Shradh of Modi Government from NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.