शहरात दुपारपर्यंत मतदान केंद्रांवर होता शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:05 PM2019-10-22T12:05:52+5:302019-10-22T12:06:14+5:30

विधानसभा निवडणूक । तृतीयपंथी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसह मतिमंद शाळेतील मतदारांनी बजावला हक्क

Shukushkat was held at polling booths till noon in the city | शहरात दुपारपर्यंत मतदान केंद्रांवर होता शुकशुकाट

dhule

googlenewsNext

धुळे : विधानसभा मतदार संघासाठी सोमवारी मतदान घेण्यात आले़ यासाठी शहरातील २८६ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती़ दरम्यान काही मतदान केंद्रावर सकाळ पासून शुकशुकाट पाहावयास मिळाला तर दुपारी तीन वाजेनंतर गर्दी झाली होती़
शहरातील महापालिका व खाजगी अशा एकून २४९ केंद्रावर सकाळी ७ ते ६ वाजेपर्यत मतदान प्रक्रिया पार पडली़ सकाळी ‘लोकमत’ च्या चमुने देवपूर, वलवाडी, वाडी-भोकर, चितोडरोड, बारापत्थर, मौलवीगंज, एैशी फुटीरोड अशा विविध मतदान केंद्रावर जावून प्रत्येक पाहणी असतांना सकाळी ७ ते १० पर्यत बहूसंख्य मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसून आला होता़
वातावरणाचा परिणाम
शंभर टक्के मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत असले पाऊस व ढगाळ वातावरणामुळे मतदारांनी सकाळी १० वाजेपर्यत पाठ फिरवली होती़ त्यामुळे कार्यकर्त्यांना मतदारांना घराबाहेर पडण्यासाठी नागरिकांना आवाहन करावे लागले होते़ दुपारी उन पडल्यानंतर मतदानासाठी केंद्रावर गर्दी झाली होती़
आदर्श मतदान केंद्रावर उत्साह
जिल्हा प्रशासनाकडून दोन ठिकाणी आदर्शन मतदान केंद्राची व्यवस्था केली होती़ त्यात देवपूरातील उन्नती विद्यालय व भोकर जिल्हा परिषद शाळा आहेत़ दिवसभरातील मतदान केंद्राची जबाबदारी महिला व अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली होती़ प्रथम मतदान करणाºया महिलांचा सत्कार करून मतदानाला सुरूवात करण्यात आली होती़
तब्बल एक तास मतदान यंत्र बंद
मुस्लिम बहूल प्रभागातील मनपा शाळा क्रं.२८ मध्ये दुपारी मतदान यंत्र बंद पडल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती़ त्यामुळे रांगेत उभे राहणाºया नांगरिकांनी गोधळ घातला होता़ यंत्राचा बघाड झाल्याची माहिती प्रशासनाला कळविण्यात आल्यानंतर एक तासानंतर दुसºया यंत्राची व्यवस्था करण्यात आली होती़ त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. मात्र यंत्र नादुरुस्तीमुळे काही वेळ मतदारांचा खोळंबा झाला.

Web Title: Shukushkat was held at polling booths till noon in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे