सिदाजी आप्पा दिंडीचे धुळ्याहून जालन्याकडे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:41 AM2019-07-23T11:41:00+5:302019-07-23T11:41:18+5:30
जालन्याहून कर्नाटकातील चिटगुप्पा येथे दिंडी जाणार, अनेक भाविकांचा सहभाग
आॅनलाइन लोकमत
धुळे : गवळी समाजाचे आराध्य दैवत ब्रह्मस्वरूप बाल ब्रह्मचारी प.पू. सिदाजी आप्पा यांच्या पायी दिंडीचे धुळ्याहून चिटगुप्पा, जि.बिदर (कर्नाटक) सोमवारी प्रस्थान झाले. दिंडीचे हे १९ वे वर्ष आहे.
सोमवारी सकाळी गवळीवाडा परिसरात असलेल्या महाकाली मंदिरात भजन, कीर्तनाचा कार्यक्रम झाला. सिदाजी आप्पांची आरती झाल्यानंतर दिंडीचे प्रस्थान झाले. ही दिंडी धुळ्यातून गवळीवाडा, मोगलाईवाडा, अमरनगर, गोकूळनगरमार्गे निघाली. पुढे ही दिंडी चाळीसगाव, कन्नडमार्गे जालन्यापर्यंत जाईल. तेथून चिटगुप्पाकडे (कर्नाटक) प्रस्थान होईल. १ आॅगस्ट रोजी ही दिंडी जालन्यात पोहचेल.दिंडी मार्गदर्शक म्हणून लक्ष्मण दहिहंडे हे आहेत. दिंडीत अनेक भाविक सहभागी झालेले आहेत. या दिंडीसाठी भागवत नागापुरे, सखाराम गेनाप्पा, औडाजी नरव्हाळ, सोमाप्पा गवळी, शाम घुगरे, संजय यादबोले, भगवान पंगुडवाळे, संभाप्पा उदीकर, लक्ष्मण मिसाळ, लक्ष्मण खंदलकर, भीमराज घुगरे, भगवान घुगरे, बंटी गवळी, माणिक बिडकर, अर्जुन पंगुडवाळे, शिवाजी बाचलकर, भागवत घुगरे आदी सहकार्य करीत आहेत.