सिग्नल दुरुस्तीची तिस:यांदा निविदा!
By admin | Published: January 8, 2017 11:38 PM2017-01-08T23:38:47+5:302017-01-08T23:38:47+5:30
धुळे : शहरातील सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसह वार्षिक निगा व देखभाल करण्यासाठी मनपाने तिस:यांदा निविदा काढली आह़े
धुळे : शहरातील सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसह वार्षिक निगा व देखभाल करण्यासाठी मनपाने तिस:यांदा निविदा काढली आह़े दोन वेळा प्रतिसाद न मिळाल्याने तिस:यांदा निविदा काढण्यात आली आह़े
शहरातील पाच प्रमुख चौकांमध्ये महापालिकेने सिग्नल यंत्रणा उभारलेली आहे. त्यात संतोषी माता चौक, कमलाबाई हायस्कूल चौक, गिंदोडिया चौक, कराचीवाला खुंट आणि देवपुरातील दत्त मंदिर चौक यांचा समावेश आहे. या पाचही चौकांमध्ये दररोज वाहतुकीची मोठी वर्दळ असते. मात्र, सिग्नल व्यवस्था सुरू नसल्याने वाहतुकीची नेहमी कोंडी होते. त्यामुळे सिग्नल नेहमी चालू असावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शहरातील संतोषीमाता चौक, कराचीवाला खुंट, दत्त मंदिर चौक, गिंदोडिया चौक या प्रमुख चौकांसह लहान-मोठय़ा चौकांमधील सिग्नल यंत्रणा नादुरुस्त आहे. अनेक सिग्नलचे लाईट तुटलेले आहेत. पोलही वाकलेले आहेत. काही सिग्नलवर धुळीचा थर आहे. काही सिग्नलचे साहित्य मनपा इमारतीच्या छतावर धूळखात पडलेले आह़े दरम्यान, विविध संघटना व नागरिकांकडून सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची मागणी होत असल्याने मनपाने सिग्नल दुरुस्ती व देखभाल करण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार यापूर्वी दोनवेळा निविदा काढण्यात आली़ मात्र प्रतिसाद न मिळाल्याने तिस:यांदा फेरनिविदा काढण्यात आली असून अंदाजपत्रकीय रक्कम 8 लाख 37 हजार 380 इतकी आह़े यापूर्वी 2014 मध्ये सिग्नलबाबत ठेका देण्यात आला होता, मात्र उपयोग झाला नाही़