सिग्नल बंद,वाहतूक कोंडीची ‘डोकेदुखी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 01:27 PM2019-11-03T13:27:24+5:302019-11-03T13:28:55+5:30
चंद्रकांत सोनार । धुळे : बंद पडलेले सिग्नल, बेशिस्त पार्कीग, अरूंद रस्ते व खड्डे यातून होणारी वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना ...
चंद्रकांत सोनार ।
धुळे : बंद पडलेले सिग्नल, बेशिस्त पार्कीग, अरूंद रस्ते व खड्डे यातून होणारी वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे़ मात्र याकडे मनपा, वाहतूक शाखा व जिल्हा प्रशासन केवळ बघ्याची भूूमिका घेत आहे़
शहरातील संतोषी माता चौक, कराचीवाला खुंट, गरूड कॉप्लेक्स, कमलाबाई विद्यालय, पारोळारोड वरील चौकात वाहतूकीची कोंडी होऊ नये म्हणून लाखो खर्चून सिग्नल बसविण्यात आले होते. पण अवघे काही दिवस व्यवस्थित चालल्यानंतर ते सिग्नल बंद पडले ते पडलेच. आजतर बहूसंख्य सिग्नलचे लाईट फुटलेले तर काहीचे खांबच वाकलेले आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून प्रत्येक चौकातील सिग्नल सुरूच झालेले नाही़ मनपाने हॉकर्स झोनचा प्रश्न अद्याप मार्गी लावलेला नाही़ त्यामुळे फेरीवाल्यांनी अतिक्रमण करत सिग्नलच्या शेजारी दुकाने थाटल्याने सिग्नल दिसत नाही. दुसरीकडे सिग्नल चालू करणे तर सोडा शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यात वाहतूक शाखा अपयशी ठरत आहे. त्यात खड्डयाची भर पडली आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे.
शहरात बेशिस्तपणे वाहने उभी करून ठेवली जातात. बोकाळलेली ही अवैध पार्किंगच आता सर्वसामान्यांच्या जीवावर उठली आहे. मात्र वाहतुकीचे नियमन करणाऱ्या वाहतूक शाखेला याचे सोयरसूतक दिसत नाही. तर शहरात मनपाने पार्किंगसाठी जागा उपलब्ध न करून दिल्याने प्रमुख रस्त्यांवर