धुळ्यात हस्ताक्षर, रंगभरण स्पर्धेला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 11:54 AM2019-12-16T11:54:42+5:302019-12-16T11:55:09+5:30
सत्कार्योत्तेजक सभेचा उपक्रम : ८२० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
आॅनलाइन लोकमत
धुळे :सत्कार्योत्तेजक सभेच्या जानकीबाई देशपांडे वाचनालयातर्फे रविवारी हस्ताक्षर व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही स्पर्धेत ८२० सहभागी झाले होते. स्पर्धेचे हे ४० वे वर्ष होते.
सत्कार्योत्तेजक सभेच्या जानकीबाई देशपांडे वाचनालायातर्फे दास नवमीनिमत्त विविध स्पर्धा घेतल्या जात असतात. रविवारी या उपक्रमांतर्गत हस्ताक्षर व रंगभरण, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ ते ११ यावेळेत न्यू.सि.टी. हायस्कूलमध्ये या स्पर्धा पार पडल्या.स्पर्धेत शहरातील १७ शाळा सहभागी झालेल्या होत्या.
यात हस्ताक्षर स्पर्धेत ५८० तर रंगभरण चित्रकला स्पर्धेत २४० असे एकूण ८२० स्पर्धक सहभागी झाले होते. यास्पर्धेतील विजेत्यांना दास नवमीच्या दिवशी मान्यवरांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
स्पर्धा यशस्वीतेसाठी वाचनालायाचे पदाधिकारी प्रा.विश्वास नकाणेकर, स्पर्धा प्रमुख राजश्री शेलकर, सुहास चौक, शंकरलाल जोशी, अमित गोराणे व न्यू. सि.टी. हायस्कुलचे मुख्याध्यापक एन.एम. जोशी यांच्यासह वाचनालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.