४० उपवरांच्या जुळल्या रेशीमगाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 04:23 PM2017-10-15T16:23:51+5:302017-10-15T16:25:09+5:30
मराठा सेवा संघातर्फे मेळावा : २५० वधू-वरांनी करून दिला परिचय
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मराठा सेवा संघ संचलित वधू-वर सूचक मंडळातर्फे रविवारी वधू-वर परिचय मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात ४० उपवरांच्या रेशीमगाठी जुळल्याची माहिती संयोजकांनी दिली. येथील मेळाव्यात दिवसभरात २५० वधू-वरांनी त्यांचा परिचय करून दिला.
नकाणेरोडवरील गरूड कॉलनीतील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात हा मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी धुळे तालुक्यातील बोरकूंडचे सरपंच बाळासाहेब भदाणे होते. प्रास्ताविक वधू-वर पालक मंडळाचे अध्यक्ष बी. टी. देवरे यांनी केले. यावेळी त्यांनी लग्न जमविण्यासाठी आधुनिक विचार मांडत येथे उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन केले. मेळाव्याच्या प्रारंभी जिजाऊ वंदना सादर झाली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते वधू-वर सूचक पुस्तिकाचे प्रकाशन झाले. यावेळी मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेडच्या प्रमुख वैशाली शिरसाठ, नगरसेविका उज्ज्वला पाटील, जयहिंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जी. एल. पाटील, जगदीश खैरनार, एस. एम. पाटील व मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन एम. एस. पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी लहू पाटील, साहेबराव देसाई, हेमंत भडक, मिलन पाटील डॉ. सुलभा कुवर यांनी परिश्रम घेतले.
अंधश्रद्धेवर विश्वास ठेऊ नका!
प्राचार्य व्ही. के. भदाणे म्हणाले, की समाजबांधवांनी कुंडलिका, ग्रह, गुणमिलन आदी गोष्टींमागे धावू नये. तसेच अंधश्रध्देवर विश्वासदेखील ठेऊ नये, असे आवाहन केले. तसेच हुंडा मागणे हा कायदेशीर गुन्हा असून वधू पक्षाकडून हुंडा घेऊ नये, असा सल्ला त्यांनी येथे दिला. यानंतर मंडळाचे अध्यक्ष गुलाब पाटील यांनीही मार्गदर्शन केले.