शिरपुरात महिलेच्या मृत्यूमुळे संतप्त नातेवाइकांची रुग्णालयात तोडफोड

By Admin | Published: March 15, 2017 12:06 AM2017-03-15T00:06:47+5:302017-03-15T00:06:47+5:30

प्रसूतीदरम्यान रक्तस्त्राव : पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

In Sirpur, the victim's family died due to the death of the relatives | शिरपुरात महिलेच्या मृत्यूमुळे संतप्त नातेवाइकांची रुग्णालयात तोडफोड

शिरपुरात महिलेच्या मृत्यूमुळे संतप्त नातेवाइकांची रुग्णालयात तोडफोड

googlenewsNext


धुळे : शिरपूर शहरातील आदर्श नगरातील डॉ. बी. टी. अग्रवाल यांच्या अग्रवाल हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल विवाहितेचा प्रसूतीनंतर अधिक रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला़ या घटनेमुळे संतप्त नातेवाइकांनी अग्रवाल हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली.  दरम्यान, याप्रकरणी शिरपूर पोलीस सटेशनला अकस्मात मृत्यूची नोंद झाली  आहे.
शहरातील वाल्मीकनगरातील दीपाली उदय ढोले (२८) या विवाहितेची पहिलीच प्रसूती होती. शहरातील बी. टी. अग्रवाल यांच्या अग्रवाल हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. मंगळवारी पहाटे त्यांना प्रसूती वेदना होऊ लागल्या. त्यावेळी रुग्णालयात डॉक्टर नव्हते. तेथे असलेल्या परिचारिकांनी त्या विवाहितेची प्रसूती केली. मात्र, प्रसूतीनंतर विवाहितेला अधिक रक्तस्त्राव होऊ लागल्याने तिचा मृत्यू झाला.  यासंदर्भात नातेवाइकांना माहिती मिळाल्यानंतर  त्यांनी अग्रवाल रुग्णालयाकडे धाव घेत, डॉक्टरांच्या दालनाची तोडफोड केली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दीपालीचा मृत्यू झाल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाइकांनी केला़   मंगळवारी दुपारी विवाहितेचा मृतदेह विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. याबाबत वॉर्डबॉयने दिलेल्या माहितीवरून शिरपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित महिलेच्या प्रसूतीवेळी लगेच रुग्णालयात पोहचलो, मात्र अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे रक्त थांबणे कठीण जात होते़ बाहेरून रक्त आणून दिले, औषधी ही लगेच दिल्या परंतु रक्तस्त्राव थांबत नव्हता़
      -डॉ़बी़टी़  अग्रवाल
शिरपूर

Web Title: In Sirpur, the victim's family died due to the death of the relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.