लघु पशुचिकित्सालय बांधकाम प्रस्ताव धूळखात
By admin | Published: January 12, 2016 12:41 AM2016-01-12T00:41:22+5:302016-01-12T00:41:22+5:30
तळोदा : लघु पशुचिकित्सालयासाठी बांधकामाचा प्रस्ताव संबंधित आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
तळोदा : लघु पशुचिकित्सालयासाठी बांधकामाचा प्रस्ताव संबंधित आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला आहे. तथापि, हा प्रस्ताव मंजुरीअभावी गेल्या तीन वर्षापासून तसाच धूळखात पडला आहे. तालुक्यातील एकमेव मोठा दवाखाना लक्षात घेऊन बांधकामाच्या या प्रस्तावास तातडीने मंजुरी देण्याची आवश्यकता आहे. तळोदा येथील विद्यानगरी परिसरातील लघु पशुचिकित्सालयाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पशुधनासही पुरेसा उपचार मिळण्यास अडचणी निर्माण होत असतात. या पाश्र्वभूमीवर या पशुचिकित्सालयाची सुसज्ज इमारत होण्यासाठी सातत्याने पशुपालकांकडून मागणी केली जात होती. त्या आनुषंगाने आरोग्य विभागाने तळोदा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधकामाचा प्रस्ताव मागविला होता. त्यानुसार, बांधकाम विभागाने 2012 साली चार कोटी नऊ लाखांचा प्रस्ताव तातडीने पाठवला होता. परंतु हा प्रस्ताव मंजुरीअभावी तसाच गेल्या तीन वर्षापासून धूळखात पडला आहे. प्रस्ताव मंजुरीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र अजूनपावेतो कोणतीही कार्यवाही झालेली नाही. 4या दवाखान्यास पूर्वी साध्या गुरांच्या दवाखान्याचा दर्जा होता. परंतु तालुक्यातील पशुधनाची संख्या लक्षात घेऊन या दवाखान्यास लघु पशुचिकित्सालयाचा दर्जा देण्यात आला. साहजिकच येथे उपचारासाठी मोठय़ा संख्येने पशुपालक आपली जनावरेही आणत होते. मात्र दवाखान्याच्या अतिशय दुरवस्थेमुळे पशुपालक उपचारासाठी जनावरे आणत नाहीत. कारण या दवाखान्यात पुरेशा सुविधा नाहीत. वास्तविक तालुक्यातील एकमेव मोठे पशुचिकित्सालय आहे. त्या दृष्टीने येथे सर्व सुविधा असणे अपेक्षित आहे. मात्र याकडे संबंधित विभागाने कायम दुर्लक्ष केले आहे. या दवाखान्याचे स्लॅबही तुटलेले आहेत. पावसाळ्यात पूर्णत: गळते. याशिवाय खिडक्याही तुटल्या आहेत. तसेच लसी ठेवण्यासाठीही पुरेशा सुविधा नाहीत. तसेच कर्मचा:यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असते. दवाखान्याच्या शेजारीच कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आणि या बाजार समितीसमोर दर शुक्रवारी पशुधनाचा बाजारही भरतो. त्यामुळे दवाखान्यात सर्व सुविधा ठेवण्याची आवश्यकता असताना आरोग्य विभाग गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे पशुपालकांनाही पुरेशा उपचारापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप आहे. 4तालुक्यातील या लघु पशुचिकित्सालयात कर्मचा:यांच्या चार जागा असताना केवळ एकमेव सहायक उपायुक्त दर्जाचा पशुधन विकास अधिकारी काम करीत आहे. त्यामुळे या दवाखान्याचा भार एकाच कर्मचा:यावर सुरू आहे. कर्मचा:यांच्या चार जागा रिक्त असताना भरतीबाबत सातत्याने मागणी होऊनही ठोस कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे पशुधनासही पुरेसा उपचार मिळत नाही. वास्तविक तालुक्यात एकमेव मोठा दवाखाना असताना कर्मचा:यांच्या भरतीबाबत संबंधित विभाग उदासीन धोरण घेत आहे. पशुचिकित्सालयाच्या अवस्थेप्रमाणेच तालुक्यातील दवाखान्यांमध्येही असेच चित्र आहे. कारण वर्ग एकचे तालुक्यात चार दवाखाने आहेत. मात्र दोनच पशुधन विकास अधिका:यांवर भार सुरू आहे. कर्मचा:यांची अशी वस्तुस्थिती असताना आरोग्य विभाग ठोस कार्यवाही करण्यास तयार नाही. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये पशुधन विकास अधिका:यांची संख्या समाधानकारक आहे. मात्र तळोद्यासारख्या आदिवासी तालुक्यात या कर्मचा:यांची वानवा आहे. संबंधितांच्या दुजाभावाच्या धोरणाबाबत येथील लोकप्रतिनिधींनीही कानावर हात ठेवल्याने पशुपालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तालुक्यातील पशुधनाची संख्या लक्षात घेऊन निदान कर्मचा:यांच्या नियुक्तीबाबत लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची मागणी आहे. साहेब आणि शिपाईही एकच 4एवढेच नव्हे तर या पशुचिकित्सालयात शिपायाचे पदही गेल्या तीन वर्षापासून रिक्त आहे. त्यामुळे शिपायाचे कामही या सहायक उपायुक्त दर्जाच्या अधिका:यालाच करावे लागत असल्याचे चित्र आहे.