धुळे जिल्ह्यातील २२८६ अंगणडीसेविकांना मिळणार स्मार्टफोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:30 AM2019-03-16T11:30:15+5:302019-03-16T11:31:14+5:30

अ‍ॅपवर बालकांची माहिती भरण्यात येणार, रिचार्जसाठीही मिळणार पैसे

Smartphone to get 2286 Kindergarten users in Dhule | धुळे जिल्ह्यातील २२८६ अंगणडीसेविकांना मिळणार स्मार्टफोन

धुळे जिल्ह्यातील २२८६ अंगणडीसेविकांना मिळणार स्मार्टफोन

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात ग्रामीण भागात २१०५ तर शहरी भागात १८१ अंगणवाड्यामोबाईल रिचार्जसाठी मिळणार ८०० रूपयेमे अखेरपर्यंत मिळणार मोबाईल

आॅनलाइन लोकमत
धुळे : शासनाकडून आता अंगणवाडीसेविका, मुख्यसेविका व पर्यवेक्षिकांना स्मार्टफोन दिला जाणार आहे. जिल्हास्तर व प्रकल्प कार्यालयातील तांत्रिक मनुष्यबळासाठी अ‍ॅन्डाईड मोबाईल फोन तोही सिमकार्ड डाटासह अंगणवाडीसेविकांना उपलब्ध करून द्यावेत अशा सूचना शासनाकडून संबंधित विभागास आलेल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २१०५, शहरी भागातील १८१ अंगणवाडी सेविका व ७७ पर्यवेक्षिकांना स्मार्ट फोन देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातून देण्यात आली.
पोषण अभियान अंतर्गत (आयसीटी-आरटीएम) या उपक्रमाची अमलबजावणी करण्यात येत असून, सर्व अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडीसेविका, पर्यवेक्षिका यांना स्मार्टफोन दिले जाणार आहेत.
केंद्र शासनाकडून अंगणवाडीसेविकांना स्मार्ट फोन उपलब्ध करून द्यावेत. याबाबत पाठपुरावा होत असल्याने, गेल्या महिन्यात नवीदिल्ली येथे झालेल्या बैठकीत सेविकांना स्मार्टफोन उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. यासाठी मे.सिस्टेक आयटी सोल्युशन कंपनीकडून मोबाईल खरेदी करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
२२८६ सेविकांना लाभ
या योजनेचा लाभ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २१०५ व शहरी भागातील १८१ अशा एकूण २२८६ अंगणवाडी सेविका व ७७ पर्यवेक्षकांना यांना होणार आहे.
रिचार्जसाठी ८०० रूपये
केवळ स्मार्टफोन देण्यात येणार नाही, तर सेविकांना फोन रिचार्जसाठी प्रत्येक तीन महिन्यासाठी ४०० रूपये याप्रमाणे सहा महिन्यांसाठी ८०० रूपये देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्वच सेविकांच्या बॅँक खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे. लवकरच ती सेविका, पर्यवेक्षिकांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगण्यात आले.
तीन टप्यात प्रशिक्षण
सेविका, पर्यवेक्षिकांना स्मार्ट फोन देण्यापूर्वी हे नवीन अ‍ॅप कसे हाताळावे, त्यात माहिती कशाप्रकारे भरण्यात यावी या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
पहिले जिल्हा प्रकल्प सहायक, जिल्हा समन्वयक, त्यानंतर प्रत्येक प्रकल्प अधिकारी व शेवटी सेविकांना याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी स्वस्थ भारत प्रेरकचे होशांगस्वामी काळे, जिल्हा प्रकल्प सहायक हितेंद्र गिरासे, जिल्हा समन्वयक त्र्यंबक बोरसे हे परिश्रम घेत आहेत.

 

Web Title: Smartphone to get 2286 Kindergarten users in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे