म्हसदीत धुव्वाधार : पत्रे उडाली, बांध फुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 10:44 PM2019-06-27T22:44:01+5:302019-06-27T22:44:28+5:30
पावसाचे आगमन : पिंपळनेरसह चिकसे, देगाव शिवारातही पावसाच्या सरी, शेती कामाला सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळनेर : पिंपळनेरसह म्हसदी शिवारात बुधवारी सायंकाळी उशीरा झालेल्या जोरदार पावसात काही घरांची पत्रे उडाली़ तर काही ठिकाणी शेताचे बांध फुटून माती वाहून गेली़ कोरड्या झालेल्या बंधाºयामध्ये काही अंशी पाणी अडकल्याने समाधान व्यक्त होत आहे़ या भागात शेती कामाला सुरुवात झाली आहे़
साक्री तालुक्यातील पिंपळनेर, सामोडे, चिकसे, देगांव, शेणपूर, मलांजन या ठिकाणी जोरदार पाऊस झाला असलातरी पिंपळनेर प्ऱ म्हसदी शिवारात पाण्याचा जोर जास्त होता़ येथील काही शेतकºयांच्या टमाटे पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे़ मिरची पिकांचेही चांगलेच नुकसान झाले आहे़ वालपापडीच्या फुलांची गळती झाल्याने उत्पन्न घटणार असल्याचे चित्र आहे़ कोथंबीरचेही नुकसान पावसामुळे झाले आहे़
तसेच चिकसे, देगाव, पिंपळनेर, प्र-म्हसदी शिवारात काही शेतकºयांच्या शेतात पाणी जास्त साचल्याने बंधारे फुटून वाहून गेले़ तर काही शेतकºयांच्या शेतातील मातीच वाहून गेली़ परिणामी शेतातच ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत़ तर चिकसे येथील शोभाबाई भटू महाले यांच्या शेतातील घरांचे पत्रे उडून गेली़ तसेच एका घरांमध्ये असलेला गुरांचा चारा आणि नऊ क्विंटल गहू संपुर्ण ओला झाला आहे़
या जोरदार पावसामुळे भाजीपाला पिकांचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे़ पिकांना वाचविण्यासाठी शेतकºयांना आता रासायनिक खतांची फवारणी करावी लागले असे चित्र दिसत आहे़ पण, जोरदार पावसामुळे परिसरात नाल्यांवर बांधण्यात आलेल्या बंधाºयांमध्ये पाणी साचले आहे़ दरम्यान, नुकसान झालेल्या शेती पिकांचा पंचनामाचे काम अद्याप कुठेही सुरु झालेले नाही़
धुळ्यातही पावसाची हजेरी, उडाली धावपळ
४धुळे शहरात गुरुवारी सकाळपासूनच वातावरणात बदल झाला होता़ दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ढग भरुन आले आणि सोसाट्याचा वारा सुरु झाला़ त्यानंतर पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली़ सुमारे पाऊण तास दमदार पाऊस झाला़
४अचानक कोसळलेल्या पावसामुळे अनेकांची धांदल उडाली़ शहरातील मालेगाव रोडवरील अग्रसेन चौकात भाजी विक्रेत्यांच्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे चांगलीच धावपळ उडाली़ तर रेल्वे स्टेशन भागात झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने पाणी बाहेर काढण्याची लगबग सुरु होती़
४शहरातील बसस्थानकात देखील बºयापैकी पाणी साचले होते़ परिणामी बसमधील प्रवाश्यांना अडचणींचा सामना करावा लागला़ साहजिकच अनेकांनी नाराजी दर्शविली़