धुळ्यात ‘जीएसटी’साठी ‘सॉफ्टवेअर अपडेशन’!

By admin | Published: July 2, 2017 10:42 AM2017-07-02T10:42:44+5:302017-07-02T10:42:44+5:30

पूर्वतयारीसाठी दुकाने बंद . काही व्यावसायिकांकडून ‘जीएसटी’ची आकारणी, बाजारात मंदी

'Software Updation' for GST in Dhule! | धुळ्यात ‘जीएसटी’साठी ‘सॉफ्टवेअर अपडेशन’!

धुळ्यात ‘जीएसटी’साठी ‘सॉफ्टवेअर अपडेशन’!

Next

ऑनलाईन लोकमत 

धुळे, दि.2 - देशभरात शनिवारी  ‘जीएसटी’ ही नवीन करप्रणाली लागू झाली आहे.पहिल्याच दिवशी काही व्यावसायिकांनी ‘जीएसटी’ची आकारणी करून मालाची विक्री केली, तर काही मोठी दुकाने मात्र ‘सॉफ्टवेअर अपडेशन’ सुरू असल्याने बंद ठेवण्यात आली होती़ परंतु, एकूणच बाजारात मंदीचे सावट असल्याचे ‘लोकमत’ च्या सव्रेक्षणात दिसून आल़े
जीएसटी लागू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने शहरातील काही मोठय़ा व नामांकित दुकानांमध्ये जाऊन जीएसटीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला़ या वेळी काही ज्वेलर्स व कापड दुकाने बंद होती़, तसेच ‘जीएसटी’च्या पाश्र्वभूमीवर ‘सॉफ्टवेअर अपडेशन’ सुरू असल्याने दुकाने बंद असल्याचे फलकही बाहेर लावण्यात आले होत़े दरम्यान, काहींनी ‘जीएसटी’ची आकारणी करून मालाची विक्री केली़  
‘जीएसटी’मुळे प्रत्येक वस्तूचे दर लक्षात घेऊन आकारणी करावी लागणार असल्याने अजून आकारणी सुरू केली नसून जुन्याच दराने विक्री करीत असल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितल़े
दरम्यान, ‘जीएसटी’मुळे केवळ व्यावसायिकच नव्हे, तर नागरिकांमध्येदेखील संभ्रमाचे वातावरण होत़े कोणत्या वस्तूवर किती टक्के ‘जीएसटी’ आकारला जाईल, हे माहीत नसल्याने अचानक वाढलेली किंमत पाहून ग्राहकांकडून अधिक माहिती घेतली जात आह़े जीएसटीची परिपूर्ण आकारणी करण्यास किमान महिनाभराचा कालावधी लागणार असल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितल़े, तर एका नामांकित कापड दुकानात कपडय़ांच्या खरेदीवर जीएसटी आकारण्यात आला़ 3 हजार  रुपयांच्या खरेदीवर 288 रुपये जीएसटीची आकारणी झाली़ त्यात 143 रुपये सीजीएसटी व 143 रुपये एसजीएसटीचा समावेश होता़ जीएसटीची अंमलबजावणी करण्यासाठी व्यावसायिक ‘सॉफ्टवेअर अपडेट’ करीत असून त्यासाठी सीए व वकिलांचे सल्ले घेतले जात आहेत़ त्याचप्रमाणे स्पर्धक व्यावसायिकांनाही विचारणा केली जात आह़े 

Web Title: 'Software Updation' for GST in Dhule!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.