मुद्रांक विक्रेत्यांचे जागेचा प्रश्न सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 10:15 PM2018-12-01T22:15:40+5:302018-12-01T22:16:12+5:30
जिल्हा प्रशासन: मुद्रांक विक्रेता संघ व दस्त लेखक संघटनेची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील तहसील कार्यालयाजवळ असलेल्या तालुका पोलिस ठाण्याजवळ मुद्रांक विक्रेते बसतात. ही जागा तालुका पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिली आहे. त्यामुळे मुद्रांक विक्रेत्यांची गैरसोय होणार असल्याने हा प्रश्न सोडवावा, विक्रेत्यांना पर्यायी जागा मिळत नाही तो पर्यत मुद्रांक विक्रेत्यांना या जागेवरून हटवू येऊ नये, अशा मागणीचे निवेदन मुद्रांक विक्रेता व दस्त-लेखक महासंघातर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले़
शहरातील तहसील कार्यालयाच्या परिसरात गेल्या अनेक वर्षापासून अधिकृतपणे मुद्रांक विक्रेत्यांची बैठक व्यवस्था करण्यात ंआली आहे़ तालुका पोलिस ठाण्याजवळ मुद्रांक विक्रेते बसतात. मात्र, सदरील जागा महसूल विभागाने गृह विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुद्रांक विक्रेत्यांचे अन्य ठिकाणी स्थलांतर केले जाणार आहे. याबाबत मुद्रांक विक्रेत्यांना दोन महिन्यांपासून सूचना दिली जात आहे. तहसील कार्यालयापासून स्थलांतर केल्यास त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे मुद्रांक विक्रेत्यांचे पुनर्वसन करून जागा द्यावी अशी मागणीकेली आहे. निवेदनावर महासंघाचे अध्यक्ष प्रकाश महाले, सचिव संजय गोसावी, नासिर पठाण, भालचंद्र भांडारकर, संजय मोरे, प्रवीण चव्हाण, सोपान चौधरी, सुभाष शिरुडे, कमलाकर कोठावदे, भिवसन अहिरे आदींच्या सह्या आहेत.