सोनगीर ग्रामपंचायत देणार शौचालय नसणा:या कुटुंबाना नोटीसा
By admin | Published: June 27, 2017 04:44 PM2017-06-27T16:44:13+5:302017-06-27T16:44:13+5:30
सोनगीर ग्रामपंचायतीचा निर्णय : 494 जणांकडे नाही शौचालये; आजपासून कार्यवाहीला सुरुवात
Next
ऑनलाईन लोकमत
सोनगीर,दि.27- धुळे तालुक्यातील सोनगीर गावात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तीक शौचालयांसाठी ग्रामपंचायत दप्तरी नोंदणी असलेल्या 2,160 कुटुंबापैकी तब्बल 494 कुटुंबाकडे शौचालय नसल्याची माहिती ग्रा. पं. कार्यालयातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्यानुसार संबंधितांना नोटीसा देण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. बुधवारपासून नोटीसा वाटपाची कार्यवाही सुरू होईल, अशी माहिती ग्रामसेवक अविनाश बैसाणे यांनी दिली.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सोनगीर ग्रामपंचायत कार्यालयाने ‘स्वच्छ सोनगीर मिशन’ राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यापाश्र्वभूमीवर हगणदारीमुक्त सोनगीर गाव संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
सर्वेक्षणातून माहिती कळली
काही दिवसांपूर्वीच ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचा:यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतस्तरावर घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ग्रामपंचायतच्या दप्तरी नोंदणी असलेल्या 2,160 कुटुंबापैकी 494 कुटुंबाकडे शौचालय नसल्याचे माहिती समोर आली होती. त्यानुसार 1 मे रोजी ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत झालेल्या ठरावानुसार शौचालये नसलेल्या लाभार्थीना नोटीसा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आता ग्रा. पं. कार्यालयातर्फे प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात होणार आहे.
लाभार्थीनी सहकार्य करण्याचे आव्हान!
शासनाच्या वैयक्तीक शौचालयाचा लाभ लाभार्थीना घेऊन ग्रामपंचायत कार्यालयाला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच योगीता महाजन, उपसरपंच धनंजय कासार व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे. 2016-17 या वर्षात ज्या कुटुंबानी वैयक्तीक शौचालयाचे काम पूर्ण केले आहे. त्यांना शासनाकडून प्रोत्साहनपर 12 हजार रुपये अनुदान देण्यात आले आहे.
उघडय़ावर शौचास बसणा:यांना कारवाईचा इशारा
उघडय़ावर किंवा सार्वजनिक जागेवर शौचास बसणे आरोग्याच्या दृष्टीने धोकेदायक आहे. गावात असे कृत्य करणा:यांवर यापुढे मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 115 व 117 नुसार कारवाई करण्याचा इशारा ग्रामपंचायत कार्यालयातर्फे देण्यात आला आहे.
शौचालय बांधण्यासाठी 5 जुलैर्पयत मुदत
शौचालये बांधण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयातर्फे सोनगीर गावात वेळोवेळी जनजागृती करण्यात आली आहे. तसेच गावात लाभार्थीना त्याचे तोंडी महत्वही पटवून देण्यात आले आहे.
ग्रामसभेतदेखील शासनाकडून मिळणा:या अनुदानाची माहिती लाभार्थीना देण्यात आली आहे. तरीही गावात अनेक शौचालयांचे कामे अपूर्ण आहेत.
त्यामुळे आता बुधवारपासून संबंधितांना नोटीस देण्यात येणार असून पाच जुलैर्पयत लाभार्थीनी शौचालयाचे बांधकाम न केल्यास त्यानंतर लाभार्थीना स्वस्त धान्य दुकानदारांकडून मिळणारे धान्य व रॉकेल बंद करण्याची शिफारस ग्रामपंचायत कार्यालयातर्फे जिल्हा प्रशासनाकडे केली जाणार आहे.