सोनगीरवासियांकडून डोंगर उतारावर चारीचे खोदकाम सुरू
By admin | Published: April 28, 2017 04:24 PM2017-04-28T16:24:32+5:302017-04-28T16:24:32+5:30
हरित सोनगीर मोहिम : ग्रामस्थ व तरुणांचा उत्स्फूतपणे सहभाग; पहिल्याच दिवशी केले श्रमदान
Next
सोनगीर,दि.28- धुळे तालुक्यातील सोनगीर गावात ‘हरित सोनगीर’ ही मोहिम राबविण्यास शुक्रवारपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी गावातील अनेक कार्यकत्र्यानी उत्स्फूर्तपणे या मोहिमेत सहभाग नोंदवत अडीच ते तीन तास श्रमदान केले. डोंगराच्या माथ्याहून पायथ्याशी येणारे पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी डोंगर उतारावर कार्यकत्र्यानी चारी खोदण्यास सुरुवात केली आहे.
ही मोहिम राबविण्यापूर्वी शुक्रवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत अवजारांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शुक्रवारी डोंगरमाथ्यावर तीन तास चाललेल्या श्रमदानात डोंगराच्या माथ्यापासून ते पायथ्यार्पयत चारी खोदण्यात आले. येत्या दोन ते तीन दिवसात गावातील नाल्यांवर बांध घातला जाणार असून त्यामुळे भविष्यात या नाल्यात पावसाचे पाणी साठल्यानंतर शेतक:यांना या पाण्याचा उपयोग होणार आहे. तसेच या मोहिमेंतर्गत ठिकठिकाणी वृक्षांचे रोपण केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
‘लामकानी पॅटर्न’चा उपयोग
धुळे तालुक्यातील लामकानी येथील पर्यावरणप्रेमी डॉ. धनंजय नेवाडकर यांच्या मार्गदर्शनातून ‘हरित सोनगीर’ ही मोहीम राबविली जात आहे. त्यासाठी लामकानी पॅटर्नचा उपयोग केला जाणार आहे.
मोहिमेत डॉ. अजय सोनवणे, डॉ. राहुल देशमुख, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जाधव, एल. बी. चौधरी, जितेंद्र बागुल, योगेश धोबी, नरेंद्र उपासनी, सुनील भदाणे, हेमंत माळी, तेजस कोठावदे, कुणाल देशमुख, कल्पेश पाखले व सोनगीर गावातील गणेश मंडळातील कार्यकत्र्यानी सहभाग नोंदवला.