गीतगायनातून ‘प्रेमस्वरुप आई’चे गुणगान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 10:11 PM2019-12-27T22:11:49+5:302019-12-27T22:12:57+5:30

विविध कार्यक्रम : झेड.बी. पाटील महाविद्यालयात स्नेहसंमेलन, पालक मेळावा

 Songs of 'Love as a Mother' from song lyrics | गीतगायनातून ‘प्रेमस्वरुप आई’चे गुणगान

Dhule

Next

धुळे : शहरातील जयहिंद शैक्षणिक संस्था संचलित झेड.बी. पाटील महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन ‘रंगचैतन्य’निमित्त युवती सभेअंतर्गत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी गीतगायनाच्या माध्यमातून ‘प्रेमस्वरुप आई’ ही संकल्पना सादर केली.
कार्यक्रमाचे उद्घाटन जयहिंद शैक्षणिक ट्रस्टच्या संचालिका तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा.डॉ.निलिमा पाटील यांच्याहस्ते झाले. व्यासपीठावर संचालिका स्मिता साळुंखे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच. पवार उपस्थित होते.
प्रा.डॉ. निलिमा पाटील म्हणाल्या, आईची भूमिका जरी काळानुसार बदलत आहे. तरी आपल्या विकासामध्ये आईला दुसरा पर्यायच नाही.आपल्या जडणघडणीत आईचा वाटा मोठा आहे. प्राचार्य डॉ.पी.एच. पवार म्हणाले, जर समाजातील आई उद्ध्वस्त झाली तर कुटुंब व्यवस्थाच उद्ध्वस्त होईल.
‘प्रेमस्वरुप आई’ या भावमधुर गीतगायन कार्यक्रमात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी पल्लवी सैंदाणे, धनंजय पवार, मोहिनी मिस्त्री, पवार, लीना बारी, ऋषिकेश पाटील यांनी गीत सादर केले. वादकांची साथ नितीन पवार, वीरेंद्र सैंदाणे, चिराग श्रॉफ मनोज गुरव, गौरव कांळगे, धीरज वाघ यांनी दिली तर निवेदन जयश्री पवार व हर्षल मराठे यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी, पालक व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळच्या सत्रात वार्षिक स्नेहलसंमेलनानिमित्त महाविद्यालयात रांगोळी, मेहंदी व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन संचालिका डॉ.निलिमा पाटील यांच्याहस्ते झाले. मेहंदी स्पर्धेचे उद्घाटन संचालिका स्मिता साळुंखे यांच्याहस्ते तर पाककला स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ.पी.एच. पवार यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.चुडामण पगारे, उपप्राचार्या डॉ.विद्या पाटील, उपप्राचार्य प्रा.व्ही.एस. पवार, स्नेहसंमेलन संयोजक डॉ.टी.जे. पाटील व डॉ.वर्षा पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ.चुडामण पगारे, उपप्राचार्या डॉ.विद्या पाटील, उपप्राचार्य प्रा.व्ही.एस. पवार, उपप्राचार्या अनिता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवती सभा संयोजक प्रा.स्वाती देसले, तसेच समिती सदस्य प्रा.भाग्यश्री पाटील, प्रा.पुनम देवरे, प्रा.कल्पना देवरे, प्रा.डॉ. अमोल पाटील, प्रा.अलका पंजाबी, डॉ.विद्या पाटील, प्रा.गितांजली बागल, प्रा.हर्षल गवळे, प्रा.जितेंद्र पाटील, प्रा.रुपाली चव्हाण, प्रा.स्वप्निल पाडवी, प्रा.मिनाक्षी बाजपेयी, प्रा.प्रतिक शिंदे, प्रा.सुर्यकांत गायकवाड, प्रा.डॉ. तेजस्वीनी कुरणे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.भाग्यश्री पाटील यांनी केले.

Web Title:  Songs of 'Love as a Mother' from song lyrics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे