महिलेच्या गळ्यातील सोनपोत हिसकावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 05:09 PM2018-12-16T17:09:23+5:302018-12-16T17:09:48+5:30
धूमस्टाईल : देवपुरातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : देवपुरातील विधी महाविद्यालय रोडवरील चितळे हॉस्पिटलजवळ महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीची ४ तोळे वजनाची सोनपोत हिसकावल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली़
शिरपूर शहरातील गणेश कॉलनीत राहणारी शोभा दत्तात्रय नेरकर (४३) ही महिला धुळ्यात देवपुरातील शारदा नेत्रालय परिसरातील नातेवाईकांकडे उत्तरकार्यासाठी आली होती़ शोभा नेरकर, मनोहर चौधरी आणि त्यांची पत्नी भूषणा चौधरी हे तिघे जण कालिपिली वाहनाने सकाळी १० वाजेच्या सुमारास सावरकर पुतळ्याजवळ उतरले़ तेथून पायी नकाणे रोडने जात असताना ७९३८ क्रमांकाच्या दुचाकीने दोघांपैकी एकाने शोभा नेरकर यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीची ४ तोळे वजनाची सोन्याची मंगलपोत खेचून नेली़ चोरटे हे २५ ते ३० वयोगटातील होते, असे महिलेचे म्हणणे आहे़ पोत खेचल्यानंतर महिलेने आरडाओरड केल्याने लोकांनी चोरट्यांचा पाठलाग केला़ पण, दोघे चोरटे पांझरेवरील छोट्या पुलाकडे पळून गेले़ याप्रकरणी देवपूर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली़ पुढील तपास देवपूर पोलीस करीत आहेत़