पोलिसांसाठी लवकरच २८० सदनिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:10 PM2019-08-18T12:10:51+5:302019-08-18T12:11:14+5:30
आराखडा मंजूर : पोलीस हौसिंग महामंडळाकडून जागेचीही पाहणी
संडे हटके बातमी
धुळे : पोलिसांना हक्काचे घर मिळावे, त्याची स्थिती उत्तम असावी यासाठी शहरातील साक्री रोडवरील कुमारनगर भागात नव्याने सदनिका बांधण्यात येणार आहे़ या कामांच्या आराखड्याला तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे़ पोलिसांसाठीच्या २८० सदनिकांसाठी पाठपुरावा सुरु आहे़
शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी वसाहती निर्माण केल्या जात असतात़ तशाच वसाहती पोलिसांसाठी सुध्दा केल्या आहेत़ पण, पोलिसांच्या वसाहतींना आता तब्बल शंभर वर्षाहून अधिक काळ झालेला असल्याने पोलिसांच्या वसाहती जुन्या झालेल्या आहेत़ घरावर लावलेले कवलाचे छपरदेखील निकामी झाले असल्याने पाऊस आल्यानंतर घर गळते़ त्यामुळे बहुतेकांनी घराच्या छतावर प्लॅस्टिक पेपर अंथरला आहे़ घर दुरुस्तीसंदर्भात वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा देखील झालेला आहे़ त्यानुसार घरांची डागडुजी सुरु असते़ त्यासाठी शासनाचा निधीदेखील खर्च केला जात असतो़ पोलिसांच्या वसाहती फारच जुन्या झाल्या असल्यामुळे नव्याने त्यांच्यासाठी सदनिका तयार करण्याचा विषय प्रशासनाच्या पटलावर होता़ दोन टप्प्यात काम मार्गी लावले जाणार असल्याने पहिल्या टप्प्यातील २८० घरे ही कुमारनगर भागातील पोलिसांच्या जुन्या वसाहतीच्या जागेवर होणार आहे़ज्या जागेवर सदनिका बांधल्या जाणार आहेत त्या जागेची पाहणी पोलीस हौसिंग महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून यापुर्वीच करण्यात आली आहे़ आवश्यक असणारा आराखडा तयार केल्यानंतर त्याला तत्त्वत: मंजुरी मिळालेली आहे़ दोन बेडरुम, हॉल आणि किचन याप्रमाणे घराची रचना असणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले़
५६० घरकुलांना मिळाली मंजूरी
पोलिसांसाठी नव्याने होणाºया ५६० घरकुलांचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर झालेला आहे़ त्यातील पहिला टप्पा हा २८० घरांचा असणार आहे़ तर तितक्याच घरांचा प्रस्ताव दुसºया टप्प्यासाठी राहणार आहे़ पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर दुसºया टप्प्याच्या कामाला प्रारंभ होईल़