सोरापाडय़ात शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी
By admin | Published: January 1, 2016 12:12 AM2016-01-01T00:12:31+5:302016-01-01T00:12:31+5:30
शेतीच्या वादातून सोरापाडा, ता.अक्कलकुवा येथे दोन गटात झालेल्या मारहाणीत दोनजण जखमी झाले.
नंदुरबार : शेतीच्या वादातून सोरापाडा, ता.अक्कलकुवा येथे दोन गटात झालेल्या मारहाणीत दोनजण जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटातर्फे परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलीस सूत्रांनुसार, सोरापाडा येथील सूरज जयसिंग वळवी व रवींद्र देवीदास सोनवणे यांच्यात शेतीचा वाद होता. शेती पाहण्यासाठी बँकेचे अधिकारी बोलविले या कारणावरून त्यांच्यात पुन्हा वादावादी झाली. त्याचे पर्यवसान मारहाणीत झाले. दोन्ही गटातर्फे लोखंडी सळई, लाठय़ा, काठय़ांचा वापर करण्यात आला. याबाबत सूरज जयसिंग वळवी यांच्या फिर्यादीनुसार डॉ.रवींद्र देवीदास पाटील, मोग्या भांग्या वळवी, चंपक इरजी सर्व रा.सोरापाडा व गंगधा गुजरात येथील इतर दोन ते तीन जण यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. त्यात सूरज वळवी हे जखमी झाले. जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी फिर्याद रवींद्र देवीदास सोनवणे यांनी दिली. बँकेच्या लोकांना शेतात आणले याचा राग येऊन जयसिंग पोसल्या वळवी, सूरज जयसिंग वळवी, जलपत पोसल्या वळवी, भरत पोसल्या वळवी, कमलीबाई जयसिंग वळवी, कालुसिंग रोडत्या पाडवी, जेसा मगन पाडवी, सुदाम सुकलाल वळवी सर्व रा.सोरापाडा यांनी लोखंडी सळई तसेच हाताबुक्यांनी मारहाण केली. रवींद्र सोनवणेची प}ी भांडण सोडविण्यास गेली असता तिलाही मारहाण करण्यात आली. मारहाणीत रवींद्र सोनवणे जखमी झाले. जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रल्हाद घाटे व फौजदार महाडिक करीत आहेत.