विशेष पोलीस महानिरीक्षक धुळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:24 PM2017-12-21T12:24:28+5:302017-12-21T12:25:54+5:30

गजानन कॉलनी : सोशल मिडीयावर वॉच

Special Inspector General of Police Dhule | विशेष पोलीस महानिरीक्षक धुळ्यात

विशेष पोलीस महानिरीक्षक धुळ्यात

googlenewsNext
ठळक मुद्देगजानन कॉलनीत तणावपुर्ण शांततापोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखलपोलीस अधीक्षक यांच्याकडून शांततेचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील ऐंशी फुटी रोडवर असलेल्या अरिहंत मंगल कार्यालय, गजानन कॉलनी भागात बुधवारी रात्री तणाव निर्माण झाला होता़ आता परिस्थिती नियंत्रणात आहे़ कोणीही अफवा पसरू नये़ सोशल मिडीयावर पोलिसांचा वॉच आहे, असे पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी स्पष्ट केले आहे़ दरम्यान, नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे धुळ्यात दाखल झाले आहेत़ 
शहरातील ८० फुटी रोडवरील अरिहंत मंगल कार्यालय, गजानन कॉलनी भागात किरकोळ कारणावरुन दोन समुदायात दंगल उसळली़ काय होत आहे, हे समजण्याच्या आत एकमेकांवर दगड भिरकाविण्यात आल्यामुळे परिस्थिती देखील गंभीर झाली होती़ आरडा-ओरड होत असताना घोषणाबाजीही करण्यात आल्याने अधिकच तणाव वाढला होता़ घटनास्थळी दगडांचा खच पडलेला होता़ 
पोलीस घटनास्थळी दाखल
घटनेचे गांभिर्य आणि वाढणारा तणाव लक्षात घेता पोलिसांना माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, धुळे विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, जितेंद्र सपकाळ, दिलीप गांगुर्डे, दत्ता पवार, दिवाणसिंग वसावे, सरिता भांड, अभिषेक पाटील यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले़ घटनेचे गांभिर्य लक्षात घेता परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी धुळे पोलिसांच्या मदतीला बाहेरुन देखील बंदोबस्त तात्काळ मागविण्यात आला आहे़ त्यात जळगाव , नंदूरबार आणि नाशिक ग्रामीणमधून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत़ 
घटनेचे गांभिर्य लक्षात घेता अफवा कोणीही पसरु नये़ सोशल मिडीयावर पोलिसांची नजर आहे़ याकामी सायबर सेल सतर्क असून घटनेवर आणि सोशल मिडीयावर लक्ष ठेवून आहे़ कोणी अफवा पसरविताना आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी दिला आहे़ 
दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे धुळ्यात आले आहेत़ त्यांनी पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार आणि वरिष्ठ अधिकाºयांची भेट घेवून घटनेचा आढावा घेत आहेत़

Web Title: Special Inspector General of Police Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.