विशेष मोहिमेचा दोन लाख नागरिकांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 11:20 PM2019-10-05T23:20:49+5:302019-10-05T23:21:21+5:30

मनपा । क्षयरोगाच्या ४४७ संशयित रूग्णांचा शोध

Special mission benefits two lakh citizens | विशेष मोहिमेचा दोन लाख नागरिकांना लाभ

dhule

Next

धुळे : राज्य शासनाच्या आरोग्य विभागातर्फे शहरात क्षयरोग, कुष्ठरोग व असंसर्गजन्य आजाराची शोध मोहिम १३ ते २८ सप्टेंबर कालावधीत राबविण्यात आली़ त्यात २ लाख २ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४४७ क्षयरोगाचे संशयित रूग्ण आढळून आले आहे़
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहर क्षयरोग नियंत्रण केद्र, महानगरपालिका, सहाय्यक संचालक कुष्ठरोग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोग, कुष्ठरोग व असंसर्गजन्य आजार रुग्ण शोधमोहिमे अंतर्गत शहरात २ लाख २ हजार नागारिकांची तपासणी करण्यात आली. दि. १३ ते २८ सप्टेंबर २०१९ या कालावधीत संयुक्त क्षयरोग, कुष्ठरोग व असंसर्गजन्य रोग रुग्णशोध राबविण्यात आली़ शासनाकडून या अभियानासाठी शहरात २ लाख २ हजार नागरिकांच्या सर्वेक्षणांचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते. त्यानुसार ५ आॅक्टोबरपर्यंत २ लाख २ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. या अभियानामध्ये क्षयरोगाचे ४४७ संशयित क्षयरुग्ण आढळुन आले. त्यापैकी ४४७ संशयित क्षयरुग्णांचे थुकी नमुने गोळा करण्यात येऊन तपासणी करण्यात आली. तर ३१६ रुग्णांचे क्ष-किरण तपासणी झाली़ आतापर्यंत थुकी दुषित व क्ष-किरण तपासणी अंतर्गत नविन २६ क्षयरुग्ण आढळुन आले आहेत़ २६ क्षयरुगणांना त्वरीत डॉट्स औषधोपचार सुरु करण्यात आले आहे. या अभियानात शहरी भागात कुष्ठरोगाचे ७१८ संशयित कुष्ठरुग्ण आढळुन आले. त्यापैकी तपासणीमध्ये निदान झालेल्या १५ कुष्ठरुग्णांना औषधोपचार सुरु करण्यात आलेला आहे.
या मोहिमेत असंसर्गिक आजाराचे देखील यशस्वीपणे सर्वेक्षण करण्यात आले. १३ सप्टेंबरपासुन शहरात अभियानास सुरुवात करण्यात आली़ सदरील मोहिम १ आॅक्टोबर ते ५ आॅक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. मोहिम महानगरपालिका आयुक्त अजीज शेख, उपायुक्त गणेश गिरी, सहाय्यक आयुक्त, शांताराम गोसावी, आरोग्याधिकारी, डॉ. मधुकर पवार, सहा. संचालक कुष्ठरोग विभाग डॉ. एस.पी. पालवे, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. जे. सी. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
मोहिम यशस्वतीपणे राबविणेकामी मनपा आरोग्य व कुष्ठरोग विभागातील कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.

Web Title: Special mission benefits two lakh citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे