दिव्यांगांच्या लसीकरणासाठी विशेष कार्यक्रम राबवादिव्यांग बांधवांची जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:36 AM2021-05-23T04:36:14+5:302021-05-23T04:36:14+5:30

निवेदनात म्हटले आहे की, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमानुसार दिव्यांग व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता त्यांच्या आजाराची दखल घेणे व त्यांना ...

Special program for the vaccination of the disabled Demonstrations of the disabled outside the Collector's office | दिव्यांगांच्या लसीकरणासाठी विशेष कार्यक्रम राबवादिव्यांग बांधवांची जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने

दिव्यांगांच्या लसीकरणासाठी विशेष कार्यक्रम राबवादिव्यांग बांधवांची जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने

Next

निवेदनात म्हटले आहे की, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमानुसार दिव्यांग व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता त्यांच्या आजाराची दखल घेणे व त्यांना उपचारात प्राधान्य देणे आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता दिव्यांगांना सदर आजाराची तपासणी, उपचार व लसीकरण करण्याकरिता लांब रांगेत उभे रहावे लागते. दिव्यांगांना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणीची अट न घालता लसीकरणाचा साप्ताहिक कार्यक्रम राबवावा अशी मागणी केली आहे.

तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायती आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांगांसाठी राखीव निधी खर्च करण्यात येत नाही. जिल्हा व तालुका समितींना विश्वासात न घेता निधी परस्पर खर्च केला जात असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.

अंत्योदय योजनेत अनेक बोगस लाभार्थी आहेत. परंतु दिव्यांगांना या योजनेचा लाभ मिळत नाही. दिव्यांगांना अंत्योदय योजनेतून दरमहा धन्य द्यावे, प्रमाणपत्र दिलेल्या दिव्यांगांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आदी सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन द्याव्या आदी मागण्या केल्या आहेत. अन्यथा, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमाचे उल्लंघन केल्याने गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Special program for the vaccination of the disabled Demonstrations of the disabled outside the Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.