नंदुरबार येथील शेतक:यांसाठी खास रेडिओ केंद्र सुरू होणार

By admin | Published: April 10, 2017 12:48 PM2017-04-10T12:48:00+5:302017-04-10T12:48:00+5:30

शेतक:यांना आधुनिक शेतीकडे वळविणे, हवामानाचा अंदाज व त्यानुसार पीक नियोजन करणे यासंदर्भातील माहिती स्थानिक बोलीभाषेत देता यावी यासाठी स्थानिक रेडिओ केंद्र नंदुरबारात सुरू होणार आहे.

Special Radio Center for Nandurbar farmers will be started | नंदुरबार येथील शेतक:यांसाठी खास रेडिओ केंद्र सुरू होणार

नंदुरबार येथील शेतक:यांसाठी खास रेडिओ केंद्र सुरू होणार

Next

स्थानिक भाषेतून कार्यक्रमांचे सादरीकरण, 76 लाख मंजूर

ऑनलाई लोकमत विशेष / मनोज शेलार  
नंदुरबार, दि.10- शेतक:यांना आधुनिक शेतीकडे वळविणे, हवामानाचा अंदाज व त्यानुसार पीक नियोजन करणे यासंदर्भातील माहिती स्थानिक बोलीभाषेत देता यावी यासाठी स्थानिक रेडिओ केंद्र नंदुरबारात सुरू होणार आहे. त्यासाठी 76 लाख रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील अशा प्रकारचे हे तिसरे रेडिओ केंद्र राहणार आहे.
नंदुरबार जिल्हा हा दुर्गम भागात आहे. भौगोलिक परिस्थिती पहाता शेती करतांना पिकांचे नियोजन करणे मोठे जिकरीचे ठरते. शिवाय शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा पाहिजे तसा शिरकाव अद्यापही झालेला नाही. ही बाब लक्षात घेता शेतक:यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, हवामानाआधारीत पीक संगोपन व नियोजन करता यावे यासाठी कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनातर्फे विविध पातळीवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यासाठी नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्राची देखील मोलाची भर पडत आहे. आता त्याचे पुढचे पाऊल म्हणून स्थानिक रेडिओ केंद्र सुरू करण्याचा निर्णय कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राने घेतला आहे. त्यास केंद्र शासनाची देखील मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात 76 लाख रुपयांचे अनुदान मंजुर करण्यात आले आहे. येत्या चार महिन्यात हे रेडिओ केंद्र कार्यान्वीत होणार आहे.
कोळदा, ता.नंदुरबार शिवारात असलेल्या कृषी विज्ञान केंद्रात हे रेडिओ केंद्र उभारले जाणार आहे. त्याच ठिकाणी इमारत आणि सहप्रेक्षपण केंद्र कार्यान्वीत राहणार आहे. त्याचे संचलन अर्थातच कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली कृषी विज्ञान केंद्र करणार आहे. कार्यक्रमाचा, प्रेक्षपणाचा आणि कर्मचा:यांसह इतर खर्च पहिल्या तीन वर्षाकरीता केंद्र सरकार देणार आहे. त्यानंतर मात्र स्थानिक उत्पन्नाच्या माध्यमातून अर्थात जाहिरात आणि प्रायोजकांच्या माध्यमातून मिळणा:या महसुलातून खर्च भागवावा लागणार आहे.
या रेडिओ केंद्राची प्रेक्षपण क्षमता सुरुवातीला केवळ 20 किलोमिटर अंतराची राहणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्याने प्रेक्षपण क्षमता वाढविण्यात येणार आहे. 
राज्यातील तिसरे
राज्यात नंदुरबारचे रेडिओ केंद्र हे तिसरे केंद्र राहणार आहे. यापूर्वी बारामती येथे हे केंद्र सुरू केले आहे. तेथील यशस्वीता लक्षात घेत बाभळेश्वर जिल्हा अहमदनगर येथे सुरू करण्यात आले. आता खास बाब म्हणून नंदुरबारात हे रेडिओ केंद्र कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून सुरू होत आहे.
दुर्गम भागातील शेतक:यांना फायदेशीर
रेडिओ केंद्रातून केवळ शेतक:यांसाठीच कार्यक्रमांचे प्रेक्षेपण राहणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक बोलीभाषेत ते राहिल अर्थात मराठी आणि आदिवासी भाषेत हे कार्यक्रम सादर होतील. हवानामाचा पूर्व अंदाज, त्यानुसार शेतक:यांनी काय करावे, त्या त्या हंगामातील पीकांची काळजी, पिकांचे नियोजन, पाण्याची पाळी, खतांचा मात्रा यासह देश आणि जगात कृषी क्षेत्रात काय उपक्रम चालले आहेत त्याची माहितीही दिली जाणार आहे. याशिवाय स्थानिक कलाकारांच्या माध्यमातून शेती आधारीत जनजागृतीपर कार्यक्रमही तयार करवून घेत त्याचे प्रेक्षेपण केले जाणार आहे. दररोज सायंकाळी दोन तास या रेडिओ केंद्रातून प्रेक्षेपण केले जाणार आहे.
 
नंदुरबारसारख्या आदिवासी भागात केंद्र शासनाने खास शेतक:यांसाठी रेडिओ केंद्र सुरू करण्यास परवागी देणे ही मोठी बाब आहे. या माध्यमातून शेतक:यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि हवामानाची माहिती दिली जाणार आहे. लवकरच या केंद्राच्या कामास सुरुवात होणार आहे.
-सुभाष नागरे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

Web Title: Special Radio Center for Nandurbar farmers will be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.