२ टँकरसह ७० लाखांचे स्पिरीट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 09:50 PM2019-12-29T21:50:35+5:302019-12-29T21:50:53+5:30

शिरपूर । राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाची कारवाई, चार परप्रांतीय चालकांना अटक

Spirit of 2 lakhs seized with 2 tankers | २ टँकरसह ७० लाखांचे स्पिरीट जप्त

Dhule

Next


शिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील सांगवी गाव शिवारात स्पिरीटची हेराफेरी करीत असलेले २ टँकर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाने रंगेहात पकडल्याची घटना घडली़ या घटनेत २ मालवाहू गाडी, २ टँकरसह ७० लाखाचे मद्यार्क (स्पिरीट) जप्त करण्यात आले असून ४ परप्रांतीय संशयितांना अटक करण्यात आली आहे़
२८ रोजी पहाटेच्या सुमारास नाशिक विभागीय भरारी पथकाने ही कारवाई केली़ महामार्गावरील सांगवी शिवारातील पार्कींग हायमास्ट स्ट्रीट लाईटखाली मद्यार्काची विक्री करण्याच्या उद्देशाने चोरटी वाहतुक होणार असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे, उपआयुक्त उषा वर्मा, अधिक्षक अर्जून ओहोळ यांना मिळाली होती़ नाशिक विभागीय भरारी पथकाने महामार्गावर सापळा रचून हेराफेरी करणाऱ्या वाहनांना पकडले़
टँकर क्रमांक एच़आऱ६१-ए-९८८९ मध्ये २१ हजार लिटर अतिशुध्द मद्यार्क, टँकर क्रमांक एच़आऱ५५-एन-६९१ मध्ये २५ हजार लिटर अतीशुध्द मद्यार्क, आयशर कंपनीचा टेम्पो क्रमांक एम़एच़१८-एए-५०२ असे तिघे वाहनांना पकडण्यात आले़ त्यात २०० लिटर क्षमतेचे एकूण २२ प्लॅस्टीक बॅरेलमध्ये अंदाजे ४४०० लिटर अतिशुध्द मद्यार्क व १५ रिकामे प्लॅस्टीक बॅरल मद्यार्क वासाचे, पिकअप गाडी क्रमांक एम़एच़१८-एए-६६४२ हिच्यात २०० लिटर क्षमतेचे एकूण ८ प्लॅस्टीक बॅरलमध्ये १६०० लिटर अतीशुध्द मद्यार्क असा एकूण ७० लाख २ हजार ५०० रूपये किंमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला़ या गुन्ह्यात २ टँकरसह २ मालवाहू असे ४ वाहने जप्त करण्यात आलीत़
या गुन्ह्यात हेराफेरी करणारे चालक धर्मबीर जिलेसिंह रा़संबांधित जिलेसिंह उमेर्वास, भिवाना हरियाणा, मंजुनाथ रामअण्णा सीरंजी रा़रामअण्णा रोट्टीगवाड कोंकनकुरट्टी, कनार्टक, ओमप्रकाश रामफल जाट-दहिया रा़रामफल लाकरीया डिघल जि़झज्जर- हरियाना, परवीन धर्मवीर लसकरी रा़लकडीया ता़बेरी जि़झज्जर-हरियाणा असे चौघे परप्रांतीय चालकांना अटक करण्यात आली़ आहे. मात्र, आयशर व पिकअप या दोन्ही वाहनाचे चालक फरार झाले आहेत़ दरम्यान, विभागीय भरारी पथकाने तालुक्यात केलेल्या कारवाईमुळे राज्य उत्पादन विभागाच्या जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष चव्हाट्यावर आले आहे.

Web Title: Spirit of 2 lakhs seized with 2 tankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे