विद्यार्थ्यांसह शिक्षक, सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 06:58 PM2019-06-24T18:58:08+5:302019-06-24T18:58:35+5:30

योगदिन : शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी मार्गदर्शनातून योगाचे महत्व केले अधोरेखीत 

Spontaneous participation of educators and general public with students | विद्यार्थ्यांसह शिक्षक, सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

दहिवद येथील एस.आर.बी. इंटरनॅशनल स्कूलमध्ये योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी अशी मानवी साखळी तयार केली.

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरासह जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयात योग दिनाचे औचित्यसाधून विविध कार्यक्रम पार पडले़ योगाचे महत्वही अधोरेखीत करण्यात आले़ 
आर.सी. पटेल शैक्षणिक संकुल
शिरपूर- येथील आर.सी. पटेल शैक्षणिक संकुल व श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मुंबई संचलित शाखांतर्फे योग दिनानिमित्त हजारो विद्यार्थ्यांनी योगासने केलीत़ संस्थेचे अध्यक्ष अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, भूपेशभाई पटेल, तपन पटेल, राजगोपाल भंडारी, डॉ. उमेश शर्मा यांच्यासह नागरीक सहभागी होते. आर्ट आॅफ लिव्हींगचे योग गुरुशिक्षक जनकभाई पटेल, रीषा पटेल तसेच योग शिक्षक विकास पाटील, देविसिंग हजारी, डॉ.सुधीर भदाणे यांनी मार्गदर्शन केले. 
एस.आर.बी. इंटरनॅशनल स्कूल
दहिवद- दहिवद येथील एस.आर.बी. इंटरनॅशनल स्कूलमध्ये योग दिन उत्साहात पार पडला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम बाविस्कर, भाग्यलक्ष्मी बाविस्कर, डॉ़ धीरज बाविस्कर, मानसी बाविस्कर, व्ही. एस. पाटील, तुषार शिवनकर, प्रेमनाथ महाजन, सविता तिवारी, एस.जे.बढे, श्रीराम कुºहेकर आदी उपस्थित होते़ 
कासारे बहुउद्देशीय विद्यालय
कासारे- साक्री तालुक्यातील कासारे येथील बहुउद्देशीय विद्यालयात योग दिन साजरा झाला़ सुरेश पारख, मुख्याध्यापक के. डी. सोनवणे होते. क्रीडा शिक्षक विलास देसले, बाळकृष्ण तोरवणे, एम. ए. भामरे, ए. एन. देसले, एच. के. देसले, तुषार सोनवणे, एस. एस. देवरे, के. पी. देसले, आर एस भदाणे उपस्थित होते़ 
सी.डी. देवरे विद्यालय
म्हसदी- साक्री तालुक्यातील म्हसदी येथील सी.डी. देवरे विद्यालयात योग दिन साजरा करण्यात आला. एस.डी. देवरे यांनी  योगासन आणि प्रात्यक्षिक करुन दाखविले. 
निकुंभे जि.प. शाळा
कापडणे- धुळे तालुक्यातील निकुंभे येथील जि.प. शाळेत योग दिन साजरा करण्यात आला़ शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शानाभाऊ पाटील, मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी आपले विचार मांडले. मार्गदर्शक वसंत पानपाटील आणि जयश्री बोरसे यांनी योगासनांचे प्रात्यक्षिक केले. कार्यक्रमासाठी प्रतिभा देवरे, गोकुळ पाटील, सोनाली बोरसे, दिनेश राजभोज, स्मिता सराफ, सुहाग सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
रावल महाविद्यालय
दोंडाईचा- येथील दादासाहेब रावल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात  तहसीलदार सुदाम महाजन यांच्या प्रमुख उपस्थित आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस एम पाटोळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून  शिंदखेडा तालुका संजय गांधी निराधार योजनेचे  अध्यक्ष  डी.एस. गिरासे,  सर्कल एम.एम.  शास्री, उपमुख्याध्यापक बी.एन. गिरासे, पर्यवेक्षक डी.जी. गिरासे  होते. योग शिक्षक भारत सिसोदिया, लक्ष्मीकांत खैरनार यांनी विविध प्रकारचे आसने, योगाचे प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमाचे आभार एम.बी. बाविस्कर यांनी मानले.
निजामपूर जि.प. उर्दू शाळेत योग दिन
 

 

Web Title: Spontaneous participation of educators and general public with students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे