त्या १४ पोलिसांचे स्वॅब निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 07:11 PM2020-05-17T19:11:05+5:302020-05-17T19:25:26+5:30
जिल्हा कारागृहात फवारणी
धुळे : जिल्हा कारागृहात असलेल्या बंदिवानाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर जिल्हा कारागृहात खळबळ उडाली होती़ त्या बंदिवानाच्या संपर्कातील १४ जणांची तपासणी केली असता ते निगेटिव्ह निघाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे़
धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपीचा न्यायालयीन कोठडीत असतांना मृत्यू झाला. त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर मनपाच्या आरोग्य विभागाने शनिवारी जिल्हा कारागृहातील कर्मचाऱ्यांची वसाहतही कंन्टेन्मेट झोन म्हणून सील केली आहे. तसेच सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मनपा आरोग्य विभागातर्फे संपूर्ण जिल्हा कारागृह परिसरात फवारणी करण्यात आली आहे. तसेच मयत कैद्याच्या संपर्कात आलेले १४ कर्मचारी व अधिकाऱ्यांचे शनिवारी सकाळी स्वॅब घेण्यात आले होते, ते सर्व निगेटिव्ह आले आहेत़
दरम्यान, कारागृहात तातडीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याची माहिती कारागृह अधीक्षक डी़ जी़ गावडे यांनी दिली़