धुळे जिल्हा बॅँकेतर्फे पीक कर्जवाटपास प्रारंभ
By Admin | Published: April 18, 2017 06:14 PM2017-04-18T18:14:32+5:302017-04-18T18:14:32+5:30
धुळे व नंदुरबार जिल्हा बॅँकेतर्फे आगामी खरीप हंगामाकरीता शेतकरी सभासदांना पीक कर्ज वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.
धुळे,दि.18- धुळे व नंदुरबार जिल्हा बॅँकेतर्फे आगामी खरीप हंगामाकरीता शेतकरी सभासदांना पीक कर्ज वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. 31 मार्चअखेर ज्या शेतक:यांनी आपल्याकडील कर्जाची परतफेड केलेली आहे, त्यांना पीक कर्ज वाटप केले जाणार आहे. मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते बॅँकेच्या गरुड बागेतील मुख्य कार्यालयात एटीएम मशिनसह रुपे डेबिट कार्ड व शेतक:यांना रुपे किसान क्रेडिट कार्ड वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे होते.
या प्रसंगी जिल्हा बॅँकेचे संचालक सुरेश रामराव पाटील, प्रभाकर चव्हाण हर्षवर्धन दहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, जिल्हा अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक प्रदीप गिलाणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
31 मार्चअखेर जिल्हा बॅँकेच्या दोन्ही जिल्ह्यातील मिळून 22 हजार 167 शेतक:यांनी मिळून प्रतिकूल परिस्थितीत 99 कोटी रुपयांचा चालू व थकीत कर्जाचा भरणा झाला. त्यात धुळे जिल्ह्यातील 15 हजार 805 चालू व थकीत कर्जदार सभासदांनी 65 कोटी तर नंदुरबार जिल्ह्यातील 6 हजार 362 सभासदांनी 34 कोटी रुपये कर्जाची परतफेड केली. सदर शेतकरी अभिनंदनास पात्र असल्याचे बॅँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी सांगितले. दोन्ही जिल्ह्यातील मिळून 22 हजार 167 शेतक:यांनी एकूण 99 कोटी रुपये थकीत कर्जाचा भरणा केला असून त्याची टक्केवारी 29 एवढी आहे.