धुळे जिल्ह्यातील चार गावांमध्ये चारा छावणी सुरू करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:29 PM2019-05-28T12:29:10+5:302019-05-28T12:30:03+5:30

ग्रामस्थांनी तहसील प्रशासनाला दिले पत्र

To start a fodder camp in four villages of Dhule district | धुळे जिल्ह्यातील चार गावांमध्ये चारा छावणी सुरू करावी

धुळे जिल्ह्यातील चार गावांमध्ये चारा छावणी सुरू करावी

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात चाºयाची तीव्र टंचाईचाºयाअभावी पशुधन विक्रीचे प्रमाण वाढलेचारा छावणी सुरू करण्याची मागणी

आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्ह्यातील गुरांना जुलै २०१९ अखेरपर्यंत चारा पुरेल असे प्रशासनाचे नियोजन असले तरी काही गावांना आता चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे चारा छावणी सुरू करावी अशी मागणी जोर धरत असून, धुळे व शिंदखेडा तालुक्यातील प्रत्येकी दोन-दोन गावांमध्ये चारा छावणी सुरू करावीत असे पत्र तहसील कार्यालयांमध्ये प्राप्त झालेले आहेत. मात्र चारा छावणी सुरू करण्याचा अद्याप कुठेच निर्णय झालेला नाही.
जिल्ह्यात गेल्यावर्षी असमाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्याला दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागतोय. आता पाणी टंचाई सोबतच चाºयाचीही चणचण भासायला सुरूवात झालेली आहे.
जिल्ह्यात जनावरांची संख्या ६ लाख ९९ हजार ६९४ एवढी आहे. या गुरांना जुलै २०१९ अखेरपर्यंत पुरेल असे नियोजन करण्यात आले होते. खरीप हंगाम, रब्बी हंगाम तसेच पशुसंवर्धन विभाग, डीपीडीसी आदींमार्फत जवळपास ६ लाख ८५ हजार ११९ मेट्रीक टन चारा ३१ जुलै १९ पर्यंत उपलब्ध असेल असे कागदोपत्री नियोजन आहे.
आता पाण्याबरोबरच चारायाचीही चणचण भासायला लागलेली आहे. जिल्ह्यात हिरवा चारा कुठेच उलब्ध नाही. कोरड्या चाºयावरच गुरांची गुजराण सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांनी चारा साठवून ठेवला आहे, त्यांच्याकडेच पशुधन सुरक्षित आहे. मात्र अल्पभुधारक शेतकरी चाºयाअभावी पशुधनाची मोठ्या प्रमाणावर विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात चारा छावणी सुरू करण्याची वेळ आलेली नव्हती. मात्र यावर्षी चाºयाची स्थिती फारच गंभीर झालेली आहे. पावसाळा लांबल्यास ही स्थिती अधिकच बिकट होऊ शकते असा अंदाज आहे.
चाºयाची टंचाई लक्षात घेऊन, राज्य शासनाने काही जिल्ह्यांमध्ये चारा छावण्या सुरू केलेल्या आहेत. त्याच धर्तीवर धुळे जिल्हयात ज्या गावांमध्ये चाºयाची तीव्र टंचाई आहे, त्याठिकाणी चारा छावणी सुरू करावी अशी मागणी होऊ लागली आहे.
धुळे तालुक्यातील हेंद्रुण-मोघण या गावात चारा छावणी सुरू करावी असा अर्ज धुळे तहसील कार्यालयाला प्राप्त झाला. त्यानुसार पशुधन विकास अधिकारी, मंडळ अधिकारी, अप्पर तहसीलदार, कृषी अधिकारी यांनी गावाला भेट देवून पहाणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर शिंदखेडा तालुक्यातील विखरण व वरझडी या गावांनाही चाºयाची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने, या दोन्ही ठिकाणी चारा छावणी सुरू करावी अशी तेथील ग्रामस्थांनी अर्जाद्वारे तहसीलदारांकडे मागणी केल्याचे सुत्रांनी सागिंतले. मात्र अद्याप एकाही ठिकाणी चारा छावणी सुरू झालेली नाही.

 

Web Title: To start a fodder camp in four villages of Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे