खासदार राजू शेट्टी यांच्या शेतकरी सन्मान यात्रेस विखरण येथून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 11:45 AM2018-05-02T11:45:12+5:302018-05-02T11:45:12+5:30
शिंदखेडा : शेतकरी धर्मा पाटील यांच्या गावापासून यात्रेस सुरुवात; सरकारवर टीकास्त्र
शिंदखेडा (जि. धुळे) : संकटात सापडलेल्या, खचलेल्या शेतकºयांना धीर देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सन्मान यात्रेत शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथून मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. मंत्रालयात विष घेऊन आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या विखरण गावापासून खासदार शेट्टी यांनी या यात्रेस प्रारंभ केला आहे.
सरकारवर टीकास्त्र
विखरण येथून यात्रेत सुरुवात झाली. त्यावेळी बोलताना खासदार शेट्टी म्हणाले, की शेतकºयांच्या जमिनी लुटणारे सरकार हे पांढºया कपड्यातील दरोडेखोर आहेत. शेतकºयांची थडगी बांधून विकासाचे मनोरे उभारणार असाल तर त्याला विरोध करणारच आहे. शेतकरी धर्मा पाटील यांचे मारेकरी अधिकारी, दलालांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी येथे केली.
शेतक-यांना देण्यासाठी सरकारचा हात आखडता
सरकारने स्वामीनाथन आयोगाची शिफारस स्वीकारली असती तर मोठा फरक सरकारला वेतन आयोगाप्रमाणे द्यावा लागला असता. शेतकरी फक्त कर्जमाफी मागतोय. पेट्रोल तयार करायला खर्च ३० रुपये खर्च येत असताना ५३ रुपये कर म्हणून घेतला जातो. सामान्य जनतेकडून लुबाडलेल्या पैसा कर्ज बुडव्याची देणी फेडायला खर्च केले जातात. मात्र, शेतकºयांना देण्यासाठी सरकार हात आखडता घेत असल्याची टीका त्यांनी येथे केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष रविकांत तुपकर यांनीही मनोगतात सरकार व मंत्र्यावर टिका केली. विखरण येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर खासदार शेट्टी हे चौपाळाकडे रवाना झाले. त्यानंतर शहादा (जि. नंदुरबार) येथे रात्री मुक्काम केल्यानंतर बुधवारी सकाळी यात्रा ही जळगाव जिल्ह्याकडे रवाना झाली.