धुळ्यात व्यंकट रमणा गोविंदाच्या जयघोषात रथोत्सवाला सुरवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 02:32 PM2018-10-20T14:32:19+5:302018-10-20T14:34:07+5:30
भगवान बालाजींच्या दर्शनासाठी लोटला भक्तांचा सागर, जल्लोषात स्वागत
आॅनलाइन लोकमत
धुळे - ‘व्यंकट रमणा गोविंदा, लक्ष्मी रमणा गोविंदा’चा जयघोष करत शहरातील खोलगल्लीतील बालाजी मंदिरापासून शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास रथोत्सवाला सुरवात झाली. १३७ वर्षांची परंपरा रथोत्सवाला आहे़ या उत्सवात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत़
सकाळी मूर्तीचा अभिषेक
शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मूर्तीचा अभिषेक करण्यात आला़ अभिषेकानंतर दोन तास मूर्तीची पूजा सुरू होती़ नैवेद्य आरती करण्यात आली़ रथाच्या पहिल्या आरतीचा मान स्व़ बाबुलाल बालाराम अग्रवाल यांचे वारसदारांना देण्यात आला.
ठिकठिकाणी स्वागत
रथोत्सवाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. रथाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. तसेच अनेक स्वयंसेवी संस्थातर्फे भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
पारंपरिक मार्ग कायम
साडेअकरा वाजेच्या सुमारास रथोत्सवाला सुरुवात झाली़ बालाजी मंदिरापासून निघालेला हा रथ पुढे चौथी गल्ली, सन्मान लॉजपर्यंत आलेला आहे़ पुढे हा रथ , राजकमल टॉकीज, आग्रा रोडवरून सरळ महात्मा गांधी पुतळामार्गे नगरपट्टी, सहावी गल्ली, मुंदडा मार्केटकडून गल्ली नंबर ४ मार्गे राममंदिराकडून बालाजी मंदिर असा मार्गस्थ होईल़
मोगरीधारकांचा गौरव
भगवान बालाजींच्या रथाला लावण्यात येणाºया मोगरीधारकांचे कसब अत्यंत शिस्तबद्ध व वैशिष्ट्यपूर्ण असते. त्यामुळे मोगरीधारकांचाही मानाचे नारळ देऊन गौरव करण्यात आला.दरम्यान, यावेळी भाविकांनी भगवान बालाजीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. बालाजींचा जयघोष सुरु होता.