धुळे-अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या काही बसेस निजामपूरमार्गे सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 09:30 PM2019-05-06T21:30:48+5:302019-05-06T21:31:36+5:30
प्रवाशांची मागणी : नंदुरबार जाणाºया प्रवाशांच्या सुविधेचाही विचार
निजामपूर : धुळे- अहमदाबादसाठी शॉर्टकट असलेला निजामपूर, नंदुरबार, डेडियापाडा मार्गे बडोदा अहमदाबाद अशा बस सेवा सुरू कराव्यात, अशी प्रवाशांकडून सातत्याने होत आहे.
शेवाळी फाटा ते नेत्रन हा राष्टÑीय महामार्ग झालेला आहे. परंतू साक्री सुरत मार्गे अहमदाबाद हे अंतर ४५० कि.मी. आहे आणि साक्री, निजामपूर, नंदुरबार, अक्कलकुवा मार्गे डेडीयापाडा, ढभोई, बरोडा, अहमदाबाद अंतर ३६० कि.मी. इतके कमी आहे. हा शॉर्टकट मार्ग आहे. प्रवाशांचा वेळ वाचतो, प्रवास भाडे कमी होते. शिवाय या मार्गावर बडोदा, अहमदाबाद जाणाºया बससेवा नाहीत. त्यामुळे प्रवाश्यांची मोठी सुविधा होईल.
सध्या अनेक बसेस साक्री, सुरत मार्गे सोडण्यात येतात. त्यांचा १० तासाचा वेळ जातो. मात्र, त्यातील एकही बस सेवा या जवळच्या मार्गावरून सुरू केलेली नाही. प्रवासी हित आणि इंधन बचतीच्या दृष्टीने एस.टी. महामंडळाने आता नवीन मार्गावरून सेवा सुरू करणे आवश्यक आहे.
धुळे, साक्री, निजामपूर मार्गे बडोदा, अहमदाबाद बसेस एस.टी. विभागाने रात्री व सकाळी सुरू करून वेळ व इंधन बचतीसह प्रवासी सेवा द्यावी, अशी मागणी प्रवासी वगार्तून होत आहे. याबाबत प्रवाशांकडून धुळे विभाग नियंत्रकांकडे मागणी करण्यात आली आहे. परमिट आल्यावर सेवा सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.