धुळे जिल्ह्यातील शिक्षकांसाठी थम्ब मशीन सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:04 PM2019-08-03T12:04:02+5:302019-08-03T12:04:53+5:30
आम आदमी पार्टी : माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदन
आॅनलाइन लोकमत
धुळे : उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयात शिक्षकांसाठी बायोमेट्रीक मशिन यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या धुळे जिल्हा शाखेतर्फे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, देशात शालेय शिक्षणाच्याबाबतीत प्रगती सांगणाºया महाराष्टÑाचे पितळे उघडे पडले आहे. गुणवत्तेच्याबाबतीत इतर राज्याच्या तुलनेत राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, आणि सर्व शासकीय शाळा पिछाडीवर असल्याचे केंद्राच्या एका अहवालातून स्पष्ट झाले आहे.धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील संस्थेंतर्गत शाळा, महाविद्यालयात शिक्षक काम करीत आहेत. शासनाकडून सर्व सुविधा घेत असून, ग्रामीण भागात सेवा बजावत आहे. शिक्षण संस्थेत काम करीत असतांना संस्था चालकांच्या दुर्लक्षामुळे काही शिक्षक वेळेवेर शिकवित नाहीत. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन राहिले नाही. शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रीक मशीन (थम मशीन) उपलब्ध असून, त्याच धर्तीवर शाळा, महाविद्यालयात थम मशीन उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील, राजेंद्र पाटील, शरद पाटील, भिकन पवार, किशोर पवार, सखुबाई पाटील यांनी केले आहे.