राज्य महामार्ग क्रमांक 13 होणार चौपदरीकरण
By admin | Published: April 26, 2017 12:56 PM2017-04-26T12:56:47+5:302017-04-26T12:56:47+5:30
अजंग ते कोंडाईबारी : 110 कि.मी.चा रस्ता; सर्वेक्षणास सुरुवात
Next
निजामपूर,जि.धुळे,दि.26- राष्ट्रीय महामार्गाना जोडणा:या अजंग ते कोंडाईबारी हा राज्य महामार्ग क्रमांक 13 लवकरच चौपदरी होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे देण्यात आली. 110 कि.मी. अंतर असलेल्या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी सर्वेक्षण सुरू झाली आहे. बी.ओ. टी. तत्वावर हा महामार्ग तयार केला जाणार आहे.
यापूर्वी निजामपूर-जैताणे गावातून जाणारा निजामपूर-नेत्रन हा 175 कि.मी.चा राष्ट्रीय महामार्ग 753 बी मंजूर झाला आहे. यापूर्वीच या रस्त्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या रस्त्याची देखभाल राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरीत झाली आहे. 24 एप्रिल रोजी निजामपूर गावातून जाणारा हा राज्य महामार्ग क्रमांक 13 साठीचे मोजमाप व सर्वेक्षण सुरू झाले आहे. अजंग, आंबोडे, सरवड, लामकानी, निजामपूर, जैताणे, वासखेडी, कोंडाईबारीर्पयत चौपदरी रस्ता होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.