मनपा आवारात पुतळा उभारणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 09:51 PM2019-12-20T21:51:57+5:302019-12-20T21:52:29+5:30
संत गाडगे महाराज : परीट समाजाचे महापालिकेच्या प्रवेशद्वारबाहेर अभिवादन करून आंदोलन
धुळे : महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात संत श्री गाडगे महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा या मागणीसाठी जिल्हा परिट समाज मंडळातर्फे पुण्यतिथीचे औचीत्य साधून मनपा प्रवेशव्दार संत गाडेग महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले़
महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात संत गाडगे महाराज यांच्या पुतळा बसविण्यासाठी २०१०पासून पाठपुरावा सुरू आहे़ त्यानुसार २०११ मध्ये महापालिकेत ठराव करून १५ लाख ५० हजार रूपयांचा ब्रांझ धातूचा पुतळा बनविण्याचे टेंडर सरमत पाटील या शिल्पकारास दिले होते़ या रक्कमपेंकी काही रक्कम ठेकेदाराला देण्यात आली आहे़ त्यानुसार संत गाडगे महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा तयार झालेला आहे़ २०१५ मध्ये महासभेत याबाबत ठराव पारीत झाल्यानंतर आवश्यक सर्व परवागण्या मिळाल्या आहेत़
महाराष्ट्र सरकारने पुतळा बसविण्यासाठी ना हरकत दाखला देण्यास एक वर्ष होऊन देखील अद्याप पुतळा बसविण्यात आलेला नाही़ मनपा आवारात पुतळा बसविण्यात यावा अन्यथा महापालिकेसमोर बिºहाड आंदोलन करण्यात येईल असा इशारा परीट समाजातर्फे देण्यात आला आहे़ यावेळी पंडित जगदाडे, संजय वाल्हे, शोभा जाधव, अनिल काकुळदे, सुनील सपकाळ, माया मोरे, अनिता दाभाडे, सुनील खैरनार, चंद्रकांत येशीराव, योगेश खैरनार, वासूदेव महारा, गुलाब सोनवणे, मंगला वाल्हे, जितू पवार,आदीं उपस्थित होते़