शिरपूर येथील किराणा दुकानात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2017 03:43 PM2017-07-10T15:43:53+5:302017-07-10T15:43:53+5:30

शिरपूर पोलिसांनी लावला काही तासात चोरटय़ांचा छडा

Stealing in grocery store in Shirpur | शिरपूर येथील किराणा दुकानात चोरी

शिरपूर येथील किराणा दुकानात चोरी

googlenewsNext

 ऑनलाईन लोकमत

शिरपूर,दि.10 - शहरातील शहादा रोडवरील किराणा दुकान व अन्य ठिकाणाहून दुचाकी चोरीच्या घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडल्या आहेत. घटनेनंतर शिरपूर पोलिसांनी काही तासातच चोरी करणा:या गुन्हेगारांचा छडा लावला असून तीन जणांना अटक केली आहे. पैकी दोन जण अल्पवयीन आहेत. 
रविवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास शहादा मार्गावरील र्मचट बँकसमोरील बाबुजी सुपर शॉपी दुकानाचा पत्रा उचकावून चोरटय़ांनी आत प्रवेश केला.  चोरटय़ांनी गल्ल्यातील रोख 8 हजार रूपये व आयडीबीआय बँकेचे डेबीट कार्ड चोरून नेल़े 9 रोजी सकाळी दुकान उघडण्यासाठी हर्षल अशोक अग्रवाल गेल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत दुकानमालक अग्रवाल यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
दुचाकी गाडी चोरीस़़़
स्वामी विवेकानंद नगरातील प्लॉट नंबर 6 मध्ये राहणारे किशोर भिकन भोई यांनी घरासमोर दुचाकी (गाडी क्रमांक एम़एच़18-एक्यू-2495) उभी केली होती.  9 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरटय़ांनी त्यांची गाडी चोरून नेली. 
बादल उदेसिंग पावरा हे बालाजी नगरात भाडय़ाची खोली करून राहतात. ते रविवारी रात्री त्यांच्या अंगणात झोपले होते. त्याचवेळी त्यांच्या अंगणात लावलेली  गाडी क्रमांक एम़एच़18- एएम-6472 व खिश्यातील 6 हजाराचा मोबाईल चोरटय़ांनी चोरून नेला़
तीन जणांना अटक
किराणा दुकानात चोरी झाल्यानंतर सीसीटीव्हीत कैद झालेला संशयित आरोपी अनिल रूमल्या पावरा (28, रा. वाघाडी) याला पोलीस उपनिरीक्षक मुकेश गुजर व पथकाने किराणा दुकान परिसरात फिरताना अटक केली. त्याने चोरीची कबुली दिली आहे. तर स्वामी विवेकानंद व बालाजी नगर येथून दुचाकी चोरी करणा:या दोन अल्पवयीन मुलांना शिरपूर पोलिसांनी वरझडी रस्त्यावरील गजानन कॉलनीतून रविवारी सकाळी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी गेलेल्या दुचाकी जप्त केली आहे. 

Web Title: Stealing in grocery store in Shirpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.