धुळ्यात खासदार हिना गावितांच्या वाहनावर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 03:43 PM2018-08-05T15:43:35+5:302018-08-05T15:45:56+5:30

मराठा आरक्षणाचा मुद्दा : मनोज मोरेंसह ८ जण ताब्यात, तणावपूर्ण वातावरण

The stone scam on the vehicle of MP Hina Haveli in Dhule | धुळ्यात खासदार हिना गावितांच्या वाहनावर दगडफेक

धुळ्यात खासदार हिना गावितांच्या वाहनावर दगडफेक

Next
ठळक मुद्देधुळ्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाखासदार डॉ़ हिना गावितांच्या वाहनावर दगडफेकतणाव निर्माण झाल्याने पोलिसांची जादा कुमक मागविली

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीला येणाºया नंदुरबारच्या खासदार डॉ़ हिना गावित यांच्या वाहनांवर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मराठा क्रांती मोर्चा आंदोलनकर्त्यांकडून दगडफेकीचा प्रकार झाला़ ही घटना रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली़ तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत  मनोज मोरेंसह ८ ते १० जणांना ताब्यात घेतले़ 
गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर आरक्षणाचा मुद्दा घेऊन मराठा क्रांती मोर्चातर्फे ठिय्या आंदोलन सुरु आहे़ त्यातच रविवारी पालकमंत्री दादा भूसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन मंडळाची बैठक होती़ पालक मंत्री दादा भुसे यांनीही सुरुवातीला आल्यावर मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळीही कार्यकर्त्यांची मोठ्याप्रमाणावर घोषणाबाजी केली. नंतर पालक मंत्री हे बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. बैठक सुरु झाल्यानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यात सहभागी होण्यासाठी खासदार डॉ़ हिना गावित या आल्या. तेव्हा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी खासदारांच्या गाडीवर चढत त्यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वाहनावर अर्धनग्न होत चढून काहींनी चाल केली़  घोषणाबाजी करत  लाथ मारुन वाहनाच्या समोरील काच फोडली़ घटनेचे गांभिर्य लक्षात घेता पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि त्यांच्यासह त्यांचे वाहन सुरक्षितस्थळी पोहचविले़ त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार उघडण्याचा प्रयत्न करत घुसण्याचा प्रयत्न केला़ 
दरम्यान, घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज मोरे यांच्यासह ८ ते १० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ त्यांना मोहाडी पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहे़ जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भूसे यांनी आंदोलनस्थळी तातडीने यावे आणि पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडून द्यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे़ या ठिकाणचे वातावरण तणावपूर्ण झाले असून पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली आहे़ 

Web Title: The stone scam on the vehicle of MP Hina Haveli in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.