बँकेत ‘कॅश’ नसल्याने मुकटीला रास्ता रोको
By admin | Published: January 31, 2017 12:06 AM2017-01-31T00:06:08+5:302017-01-31T00:06:08+5:30
धुळे : तालुक्यातील मुकटी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कॅश उपलब्ध नसल्याने बँकेत आलेल्या शेतकरी, मजूर, महिलांनी सोमवारी रास्ता रोको आंदोलन केल़े
धुळे : तालुक्यातील मुकटी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कॅश उपलब्ध नसल्याने बँकेत आलेल्या शेतकरी, मजूर, महिलांनी सोमवारी रास्ता रोको आंदोलन केल़े सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास आंदोलन झाल़े दरम्यान, दीड ते दोन तासांनी ‘कॅश’ उपलब्ध झाल्यानंतर बँकेचे कामकाज सुरू झाल़े मुकटी येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत सोमवारी सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती़ मात्र बँकेकडे ‘कॅश’ उपलब्ध नसल्याचे 11 वाजता स्पष्ट झाल्याने शेतकरी, महिला, मजूर यांनी एकत्र येत महामार्गावर रास्तारोको केल़े
बँकेचे वरिष्ठ अधिकारी तत्काळ मुकटीला दाखल झाले व काही वेळातच ‘कॅश’ मागविण्यात आली़ त्यानंतर बँकेचे कामकाज सुरळीत झाल़े सदर आंदोलनाच्या पाश्र्वभुमीवर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता़ -वृत्त/हॅलो