पाण्यासाठीची भटकंती थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 02:51 PM2019-04-17T14:51:54+5:302019-04-17T14:52:30+5:30
मी धुळेकर : टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करा, निवेदनाद्वारे मागणी
धुळे : शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना आठ ते दहा दिवसानंतर पाणीपुरवठा केला जातो़ त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे़ जिल्हा प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याबाबत नियोजन करण्यात यावे अशा मागणी मी धुळेकर संघटनेतर्फे करण्यात आली़
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळत्या व व्हॉल्व लिकेलव्दारे हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे़ त्यामुळे शहरातील विविध प्रभागांमध्ये ला आठ ते दहा दिवसानंतर पाणीपुरवठा केला जात आहे़
शहरातील होणाºया पाणीपुरवठ्याची वेळ निश्चित नसल्याने काही प्रभागात नियमित तर काही प्रभागांकडे दुर्र्लक्ष करण्यात येते़ त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडते़ तर ग्रामीण भागात विहीरी, बोअरवेलची पाण्याची पातळी खालावली आहे़ त्यामुळे गुरासह नागरिकांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ तरी नकाणे व डेडरगाव तलावातुन पाणी सोडण्यात यावे, शहरातील पाणीपुरवठ्याची नियोजन करावे, पाणीटंचाईग्रस्त गावांना टॅकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात यावा, जलवाहिनी, व्हॉल गळत्याच्या दुरूस्त्या करण्यात यावी, नागरिकांच्या पाणी प्र्श्न तत्काळ सोडविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे़