प्रसूतीविभागातील अस्वच्छतेच्या निषेधार्थ ठिय्या

By admin | Published: June 29, 2017 01:03 PM2017-06-29T13:03:34+5:302017-06-29T13:04:55+5:30

स्थायीत विषय पुन्हा बारगळला : मलेरिया विभागाच्या वेतनावरून गदारोळ, महिला सदस्यांचा ठिय्या

Strains against the prohibition of miscarriage in the delivery board | प्रसूतीविभागातील अस्वच्छतेच्या निषेधार्थ ठिय्या

प्रसूतीविभागातील अस्वच्छतेच्या निषेधार्थ ठिय्या

Next

 ऑनलाईन लोकमत

धुळे,दि.29 - गेल्या तीन वर्षापासून मनपात चर्चेत असलेल्या कचरा संकलनाचा विषय जैसे-थे राहणार असून बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत टिप्पणीत त्रुटी काढून विषय तहकूब करण्यात आला़ तर आरोग्य विभागाच्या प्रसूतीगृहात असलेल्या अस्वच्छता व असुविधांच्या निषेधार्थ महिला सदस्यांनी सभागृहातच ठाण मांडले होत़े
मनपा स्थायी समितीची सभा बुधवारी सभापती कैलास चौधरी यांच्या उपस्थितीत झाली़  यावेळी उपायुक्त रवींद्र जाधव, प्ऱनगरसचिव मनोज वाघ व सदस्यांमध्ये कमलेश देवरे, साबीर सैय्यद, संजय गुजराथी, नाना वाघ, गुलाब माळी, दीपक शेलार, मायादेवी परदेशी, वालीबेन मंडोरे, इंदूबाई वाघ हे सदस्य उपस्थित होत़े 
आरोग्य विभागांतर्गत येणा:या मलेरिया विभागाच्या कर्मचा:यांच्या वेतनासाठी अर्थसंकल्पात 1 कोटी 86 लाख रूपयांची तरतूद असतांना आता पुन्हा त्याच विभागात कामगार पुरविण्यासाठी 60 लाख रूपयांच्या विषय मंजूरीचा घाट घातला जात असल्याचा आरोप नगरसेवक संजय गुजराथी यांनी केला़
आरोग्याधिका:यांना फटकारले
शहरात फवारणी, अॅबेटिंग सुरू आहे का? असा प्रश्न नगरसेविका मायादेवी परदेशी यांनी उपस्थित केला असता आरोग्याधिकारी डॉ़महेश मोरे, सहाय्यक आरोग्याधिकारी रत्नाकर माळी यांनी मान हलवून उत्तर दिल़े पण ते होकारार्थी की नकारार्थी हे न समजल्याने उपायुक्त रवींद्र जाधव यांनी दोघा अधिका:यांना फटकारल़े तेव्हा डॉ़मोरे यांनी डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांना आळा घालण्यासाठी जनजागृतीची मोहीम सुरू केल्याचे स्पष्ट केल़े 

Web Title: Strains against the prohibition of miscarriage in the delivery board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.