धुळ्यात दोन गटात दगडफेकीमुळे तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 11:07 AM2017-12-21T11:07:54+5:302017-12-21T11:20:21+5:30
गजानन कॉलनी पुन्हा चर्चेत : घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील ८० फुटी रोडवरील गजानन कॉलनी, अरिहंत मंगल कार्यालयाजवळ बुधवारी रात्री साडेदहा-अकरा वाजेच्या सुमारास दोन समुदाय आमने-सामने भिडले़ परस्परांमध्ये दगडफेक झाल्याने क्षणार्धात तणावाची स्थिती निर्माण झाली़ घटनेचे वृत्त कळताच पोलीस अधीक्षकांसह सर्वच अधिकाºयांनी घटनास्थळ गाठले़ परिस्थिती नियंत्रणात आणली़ याप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटे संशयित ३० आणि इतर ६० ते ७० जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला़
शहरातील ८० फुटी रोडवरील अरिहंत मंगल कार्यालय, गजानन कॉलनी भागात किरकोळ कारणावरुन दोन समुदायात दंगल उसळली़ काय होत आहे, हे समजण्याच्या आत एकमेकांवर दगड भिरकाविण्यात आल्यामुळे परिस्थिती देखील गंभीर झाली होती़ आरडा-ओरड होत असताना घोषणाबाजीही करण्यात आल्याने अधिकच तणाव वाढला होता़ घटनास्थळी दगडांचा खच पडलेला होता़
पोलीस घटनास्थळी दाखल
घटनेचे गांभिर्य आणि वाढणारा तणाव लक्षात घेता पोलिसांना माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, धुळे विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ, धुळे शहर पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, आझाद नगरचे पोलीस निरीक्षक दत्ता पवार, धुळे तालुक्याचे पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरिता भांड, मोहाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्यासह पोलिसांच्या आरसीपी कंपनीच्या ६ तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या़
बाहेरुन आला बंदोबस्त
घटनेचे गांभिर्य लक्षात घेता परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी धुळे पोलिसांच्या मदतीला बाहेरुन देखील बंदोबस्त तात्काळ मागविण्यात आला होता़ त्यात जळगाव येथून २ अधिकारी ५० कर्मचारी, नंदूरबार येथून ४ अधिकारी ४३ कर्मचारी, नाशिक ग्रामीणमधून २ अधिकारी ४० कर्मचारी आणि याशिवाय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ मधील एक तुकडी लगोलग दाखल झाली़ त्यांनी सुरुवातीला घटनास्थळी निर्माण होत असलेली गर्दी पांगविली़ या भागातील तणावाची स्थिती शांत करण्याचा प्रयत्नही केला़
समुदायविरुध्द गुन्ह्याची नोंद
दगडफेकीची घटना बुधवारी रात्री घडल्यानंतर परिस्थिती शांत करण्यात आली़ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी यांनी चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटे सव्वा चार वाजता फिर्याद दाखल केली़ त्यानुसार संशयितांमध्ये सईद (फरीदाबाईचा जावाई), सादीकदादा (कॅरम क्लबवाला), बबल्या अनिस (बाबा नगर), रईस अनिस (बाबा नगर), छन्ना मुख्तार (हाजी नगर), इम्रान बिजली (कबीरगंज), नासीर समद दारुवाले (हाजी नगर), छोटू भंगारवाल्याचा भाऊ (हाजी नगर), सलीम शहा बापू (सलीम चिºया), पापा गोल्डन, इम्रान रोटी (जनता सोसायटी), बबल्या (सात खोली, पत्र्यावाली मशिदीजवळ), वाईद मुल्ला, कासीम अन्सारी, नदीम काल्या (जनता सोसायटी) आणि त्यांच्यासोबत अन्य तसेच मांगीलाल सरग, पंकज धात्रक, भटू वराडे, ललित येलमाने, राजू मराठे, राकेश जैन, हर्षल गवळी, शेखर भडागे, बाल्या मराठे, मायाभाई, जयेश खैरनार, प्रमोद चौधरी, राजू पाटील (हमाल मापाडी), पप्पू मारवाडी (शिव महिमा अपार्टमेंट), संजू तात्या (हमाल मापाडी) यांच्याविरोधात चाळीसगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली़ त्यानुसार, भादंवि कलम ३०७, ३५३, ३३२, ३३७, १४३, १४७, १४९, ५०६ आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेचा पुढील तपास चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ करीत आहेत़