धुळ्यात दोन गट भिडल्याने तणावाची स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:15 PM2019-01-08T12:15:02+5:302019-01-08T12:16:14+5:30
परस्पर विरोधी फिर्याद : १३ जणांविरुध्द गुन्हा दाखल
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील नेहरु चौकात सोमवारी रात्री दोन गटात हाणामारी झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ यावेळी लाठ्या-काठ्यांसह बेसबॉलच्या दांड्याचा सर्रासपणे वापर करण्यात आला़ मागील भांडणाची कुरापत काढून झालेल्या या हाणामारीत जखमी झालेल्या दोघांवर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत़ याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात एका गटाकडून गिरीष राजाराम चौधरी तर दुसºया गटाकडून विरेंद्र चंद्रभान अहिरे यांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास परस्पर विरोधी फिर्याद नोंदविली़ त्यानुसार दोन्ही गट मिळून १३ जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे़