घरकूल योजनेबाबत तणावपूर्ण अट्टाहास!

By admin | Published: February 14, 2017 12:28 AM2017-02-14T00:28:07+5:302017-02-14T00:28:07+5:30

महापालिका : जुने धुळे परिसरातील प्रस्तावित घरकूल योजनेवरून दोन गटांचे वेगवेगळे आंदोलन

Stressful intensity about the home loan scheme! | घरकूल योजनेबाबत तणावपूर्ण अट्टाहास!

घरकूल योजनेबाबत तणावपूर्ण अट्टाहास!

Next

धुळे : शहरातील जुने धुळे परिसरात प्रस्तावित व वादग्रस्त पाश्र्वभूमी असलेल्या घरकूल योजनेचा वाद सोमवारी पुन्हा एकदा उफाळून आला़ मनपाचे पथक पोलीस बंदोबस्त घेऊन अतिक्रमण हटविण्यासाठी गेले असता एका गटाने घरकूल योजनेला विरोध करीत मनपात येऊन धरणे आंदोलन केले, तर दुपारनंतर याच परिसरातील दुस:या गटाने मनपात येऊन घरकूल योजनेचे काम सुरू करण्याची मागणी केली़ एकूणच घरकूल योजनेबाबत दोन गटांचा तणावपूर्ण अट्टाहास दिसून आला़
अशी आहे पाश्र्वभूमी
शहरातील जुने धुळे परिसरातील सुपडूआप्पा कॉलनीजवळ असलेल्या गट क्रमांक 36 मध्ये मनपाने एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास योजनेंतर्गत घरकूल योजना प्रस्तावित करण्यात आली आह़े मात्र सदर योजनेच्या लाभार्थीमध्ये दोन गट पडले आहेत़ एका गटाचा घरकूल योजनेस विरोध असून दुस:या गटाकडून योजनेचे काम सुरू करण्याची मागणी होत आह़े सदर घरकूल योजनेच्या वादातून जुने धुळे परिसरात दगडफेक झाली होती़ त्यामुळे योजना पहिल्यापासूनच वादाच्या भोव:यात आह़े
लाभार्थीची मनपात धाव
महापालिकेने प्रस्तावित केलेल्या घरकूल योजनेसाठी निधी प्राप्त झाला असून मार्चर्पयत हे काम सुरू न झाल्यास निधी परत जाणार आह़े त्यामुळे योजना सुरू होणे आवश्यक असल्याने प्रस्तावित जागेवरील अतिक्रमित झोपडय़ा हटविण्यासाठी मनपा अतिक्रमण निमरूलन विभागाचे पथक सोमवारी सकाळी जुने धुळ्यात पोहचल़े मात्र त्याचवेळी संबंधित नागरिकांनी प्रस्तावित जागेलगत असलेले दुस:या गटाचे अतिक्रमण हटविण्याची मागणी करीत मनपात धाव घेतली व मनपाचे अतिक्रमण निमरूलन अधिकारी नंदकुमार बैसाणे यांना घेराव घातला. बैसाणे यांना कारवाईचा जाब विचारत संताप व्यक्त करण्यात आला, त्यानंतर लाभार्थीनी मनपात ठिय्या आंदोलन सुरू केल़े
चर्चेतही मार्ग नाही़़
मनपात ठिय्या आंदोलन करणा:या नागरिकांपैकी काहींना महापौरांकडे चर्चेसाठी बोलाविण्यात आल़े या वेळी आयुक्त संगीता धायगुडे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव, आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, सुनील महाले, नगरसेवक चंद्रकांत सोनार, अभियंता कैलास शिंदे, चंद्रकांत उगले उपस्थित होत़े या वेळी संबंधित लाभार्थीनी, आम्हाला अपार्टमेंटची घरे नको, तसेच गट क्रमांक 36 ची मोजणी करावी व त्यात शक्य तेवढी घरे उभारावीत, अशी भूमिका घेतली़ मात्र सदर योजनेतील दुस:या गटाच्या नागरिकांचादेखील लाभार्थीमध्ये समावेश असल्याने त्यांचेही अतिक्रमण काढावे, अशी संबंधित नागरिकांची मागणी होती़ मात्र प्रस्तावित जागा सोडून अन्यत्र कारवाई कशी करणार? असा प्रश्न मनपा अधिका:यांना पडला होता़ अखेर आयुक्त संगीता धायगुडे यांनी अतिक्रमण स्वत:हून काढा अन्यथा मनपाला कारवाई करावी लागेल अशी भूमिका घेतली़ चर्चेअंती संबंधितांना दोन दिवसांची मुदत दिल्याचे आयुक्त संगीता धायगुडे यांनी स्पष्ट केले. मात्र घरकूल योजनेंतर्गत अपार्टमेंट उभारण्यास विरोध असल्याचे संबंधित नागरिकांनी सायंकाळी स्पष्ट केल़े
घरकूल योजना सुरू करा
दरम्यान, दुपारी साडेतीन वाजता दुस:या गटातील नागरिक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, नगरसेविका हिराबाई ठाकरे, सुनील बैसाणे यांच्या नेतृत्वाखाली मनपात दाखल झाल़े त्यांनी आयुक्तांची भेट घेत संबंधितांना दोन दिवसांची मुदत का दिली? असा प्रश्न केला व योजनेचे काम सुरू होत नाही तोर्पयत मनपातच बसून राहू, अशी भूमिका घेतली़ संबंधित नागरिकांनी यापूर्वी स्वत:ची अतिक्रमणे काढून घेत शिवसेनेच्या नेतृत्वात मनपात बि:हाड आंदोलन केले होत़े सदर पाश्र्वभूमीवर मनपात दिवसभर पोलीस बंदोबस्त तैनात होता़ मनपात नागरिकांनी स्वयंपाकही केला़

Web Title: Stressful intensity about the home loan scheme!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.