प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामांमध्ये हलगर्जी करणाºयांवर कठोर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 12:05 PM2019-10-29T12:05:30+5:302019-10-29T12:05:50+5:30

जिल्हा परिषद : मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सूचक इशारा

Strict action against those who are involved in the activities of primary health centers | प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामांमध्ये हलगर्जी करणाºयांवर कठोर कारवाई

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामांमध्ये हलगर्जी करणाºयांवर कठोर कारवाई

Next

धुळे : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी यांनी आरोग्य केंद्राला अचानक भेट देण्यास सुरुवात केलेली आहे़ त्यानुसार, त्यांनी खेडेसह नेर आणि कुसुंबा येथील आरोग्य केंद्राची पाहणी केली़ कर्मचाºयांना कामकाजात सुधारणा करण्याची सूचना केली़ कामात सुधारणा करा़ अन्यथा, हलगर्जीपणा करणाºयांवर कार्यमुक्त करण्यात येईल़ असा इशारा त्यांनी दिला़
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत़ आरोग्य केंद्राचा कारभार सुधारावा यासाठी स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेटी देण्यास सुरुवात केली आहे़ या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी देखील आरोग्य केंद्राना भेटी देण्यास सुरुवात केली आहे़ जिल्ह्यातील ग्रामीण लोकांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी ४७ प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु  करण्यात आलेले आहे़ या केंद्रांच्या सक्षमीकरणासह केंद्रातून नागरीकांना चांगली सेवा मिळावी या उद्देशाने अकस्मात भेटी देण्यास सुरुवात झाली़ त्यानुसार, आर्वी, बोरकुंड, शिरुड, नगाव, मुकटी या विविध केंद्राला भेट देण्यात आली होती़ त्यानंतर त्यांनीच काही दिवसांपुर्वीच खेडे, कुसुंबा, नेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली़  त्याप्रसंगी वान्मथी सी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी मिळणाºया सुविधेबाबत सविस्तर चर्चा केली़ अधिकारी आणि कर्मचाºयांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर उपस्थित रहावे़ आरोग्य केंद्राचा परिसर स्वच्छ ठेवावा़ प्लॅस्टिकमुक्त प्राथमिक आरोग्य केंद्र करावे़ आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, अशा विविध प्रकारच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या़ तसेच कामांत हलगर्जीपणा करणाºयांना आगामी काळात कार्यमुक्त करण्यात येईल असाही इशारा त्यांनी दिला़  
दरम्यान, या अचानक राबविण्यात येणाºया मोहिमेमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे़ 
रात्रीही दिल्या जाणार अचानक भेटी
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नागरीकांना २४ तास सेवा मिळणे आवश्यक आहे़ मात्र, असे असताना सुटीच्या दिवशी तसेच रात्री प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नागरीकांना सुविधा पुरविली जात नाही़ त्यामुळे आता स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी सायंकाळी आणि रात्रीच्या वेळेस अचानकपणे आरोग्य केंद्राना भेट देणार आहे़ त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही रात्रीची भेट देण्याचे आदेश पारीत केले आहेत़ 

Web Title: Strict action against those who are involved in the activities of primary health centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे