कडाक्याच्या थंडीत केली ‘स्वच्छता’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 11:10 PM2020-01-11T23:10:28+5:302020-01-11T23:11:07+5:30
पांझरा नदी पात्र स्वच्छता मोहीम । शाळा, महाविद्यालय, सामााजिक संस्था, अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग
धुळे : स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या मानाकंन प्राप्त करण्यासाठी पांझरा नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली़ शनिवारी सकाळी कडाक्याच्या थंडीत सुमारे १ हजार ६०० विद्यार्थी, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला होता़
याप्रसंगी उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती युवराज पाटील, महिला बालकल्याण सभापती निशा पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी आयुक्त अजिज शेख यांनी स्वच्छतेची शपथ देऊन नदी पात्र स्वच्छता मोहिमेस प्रारंभ केला. यावेळी पाटी, पावडी, झाडु, बादली आदी साहित्यांसह पोलीस प्रशिक्षण केंद्रातील २०० पोलीस महिला कर्मचारी ड्रेसकोडसह सहभागी झाल्या. याशिवाय मोहिमेत एन.सी. सी, एनएसएस, स्काऊट गाईडचे विद्यार्थी, अधिकारी व कर्मचाºयांनी स्वच्छतेच्या घोषणा देत स्वच्छतेविषयी जनजागृती केली़
याठिकाणी राबविली माहिम
शनिवारी सकाळी ७ ते १० वाजेदरम्यान पांझरा नदीपात्रात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली़ या मोहिमेत हजारो धुळेकरांनी सहभाग नोंदविला़
सिध्दीविनायक गणपती मंदिर ते लहानपुल या परिसरातील पांझरा नदीकाठावरील दोन्ही बाजुच्या गवत, कचरा, पुजेचे साहित्य नष्ट करण्यात आले.
३५ टन कचरा संकलन
मोहिमेसाठी ४ जेसीबी, २ डंपर, १२ ट्रॅक्टरद्वारे नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली़ यावेळी नदीपात्रातून प्लास्टीक, टाकाऊ पदार्थ, कचरा गोळा करण्यात आला़ तसेच मलेरिया विभागामार्फेत नदीच्या दोन्ही बाजुस व जमा झालेल्या पाण्यात रसायन फवारणी केली़
यांचा होता सहभाग
इनरव्हिल, सप्तश्रृंगी, इंदिरा महिला मंडळ संचलित परदेशी शाळेचे शिक्षक व पदाधिकारी, पोलिस प्रशिक्षणचे प्राचार्य बच्छाव, आरपीआय चौधरी, उपायुक्त गणेश गिरी, नगरसेविका प्रतिभा चौधरी, लक्ष्मी बागुल, वंदना मराठे, धनराज पाटील, आरोग्याधिकारी डॉ़ महेश मोरे, सिमा मराठे, धनराज पाटील, अभियंता कैलास शिंदे, मनपा शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी महेंद्र जोशी, नारायण सोनार, चंद्रकांत जाधव, लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वाहिदअली सैय्यद, मनोज वाघ, अनिल साळूंखे यांनी केले. शहरातील मोहम्मदीया उदु, कानुश्री, पटेल हायस्कूल, गरूड हायस्कूल, मनपा शाळा २०, स्वामी टेऊराम, महाराणा प्रताप, कमलाबाई कन्या शाळा, घासकडबी महाविद्यालय, न्यू़ सिटी शाळेच्या विद्यार्थ्यांनी श्रमदान केले.