पाण्याच्या नियोजनाकडे प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 05:58 PM2018-12-08T17:58:42+5:302018-12-08T18:00:01+5:30
महादेव दोंदवाडा : विकास योजना आपल्या दारी कार्यक्रमात भूपेशभाई पटेल
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : संपुर्ण तालुक्याच्या विकासाकडे लक्ष असून त्यासाठी पूर्णपणे प्रयत्न सुरु आहेत. महादेव दोंदवाडा गावाला आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे सर्व प्रयत्न सुरु असून आहेत. गावातील शिक्षणासाठी खास प्रयत्नशील आहोत. सर्व मुलभूत सुविधा दिल्या जातील. पाण्याचे नियोजनाकडे लक्ष दिले जाईल असे प्रतिपादन शिरपूर प्रियदर्शिनी सुतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल यांनी विकास योजना आपल्या दारी अभियान कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना केले़
महादेव दोंदवाडा येथे आर.सी.पटेल मेडिकल फाऊंडेशन, तालुका युवक काँग्रेस, शंकरा आय हॉस्पीटल यांच्यावतीने ७८ वे आरोग्य शिबीर तसेच विकास योजना आपल्या दारी अभियानचे उद्घाटन करण्यात आले़
यावेळी आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, शिरपूर टेक्सटाईल पार्कचे चेअरमन तपनभाई पटेल, माजी जि.प. उपाध्यक्ष के.डी.पाटील, पं.स. उपसभापती संजय पाटील, माजी सरपंच बुधा माला पावरा, सरपंच कमलबाई पावरा, माजी सरपंच मोवाशा पावरा, उपसरपंच किसन पावरा, डॉ.विजय राजपूत, माजी पं.स.सदस्य गयास खाटीक, अनारसिंग जाधव, अनिल पाटील, रविंद्र कोळी, दिपक पावरा, नकला पावरा, जगतराव पावरा, संगिता पावरा, पमाबाई पावरा, मेलवीबाई पावरा, पेरवीबाई पावरा, युवक काँग्रेस शाखाध्यक्ष किसन पावरा, सोनू पावरा, सुक्राम पावरा, नाना पावरा, छोटूराम पावरा, सुनिल पावरा, सुक्राम भिल, बागल्या पावरा, रविंद्र पावरा, दरबारसिंग जाधव, प्रदीप पावरा, सुनिल जैन आदी उपस्थित होते.
आमदार काशीराम पावरा म्हणाले, तालुक्यातील कोणीही नागरीक आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही असे नियोजनबद्ध काम आमदार अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. पं.स.उपसभापती संजय पाटील म्हणाले, पंचायत समितीमार्फत ग्रामीण भागात आवश्यक ती सर्व कामे सुरु आहेत. विविध योजनांचा लाभ देण्याचे काम केले जात आहे. या शिबीरात २४५ जणांची डोळे तपासणी करण्यात आली. ३३ जणांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येईल. अनेक जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. सुत्रसंचालन साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भैरव राजपूत, महेश पाठक, संदीप शिरसाठ, नईम इनामदार, विशाल पाटील, अनिल सोनवणे, विकास योजना आपल्या दारी अभियानचे कार्यकर्ते यांनी सहकार्य केले़