बाह्मणे परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:51 AM2019-07-01T11:51:50+5:302019-07-01T11:52:22+5:30

शेतांमध्ये पाणी : ‘ढगफुटी’ची ग्रामस्थांमध्ये भीती 

Strong rainfall in Bahmane area | बाह्मणे परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी

बाह्मणे गावात पाणी शिरल्याने पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली. 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथे रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात  पुरासारखे पाणी वाहिल्याने पेरणी झालेल्या ३०- ४० शेतांमधील बी-बियाण्यांसह माती वाहून गेल्याचे शेतकºयांनी सांगितले. सुदैवाने यात जीवितहानी टळली. जोरदार पावसामुळे ‘ढगफुटी’ झाल्याची भीती व्यक्त केली जात होती. 
रस्ते वाहतूक वळविली 
दोंडाईचा - शिंदखेडा रस्त्यावरील धमाणे गावाजवळ पुलाचे काम सुरू आहे. या जोरदार पावसामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक लोहगाव मार्गाने बाम्हणे - दोंडाईचा  या मार्गे वळविण्यात आली आहे. दरम्यान परिसरातील शेतांमध्ये अद्याप पाणी साचलेले आहे. बाह्मणे गावालगत असलेल्या रस्त्यानजीक असलेल्या खोल गटारींना लागून असलेल्या पक्क्या रस्त्यावर तीन फूट पाणी वाहत होते. अल्पावधीत  म्हणजे केवळ अर्ध्या तासात एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस बरसल्याने ही ‘ढगफुटी’ असावी, असे मत जाणकारांमध्ये व्यक्त होत आहे.  
 दोंडाईचा शहरातही संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास पाऊस सुरू झाला.   रात्री उशिरापर्यंत तो सुरूच होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असतांनाही सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र शेतांचे तसेच पेरणी केलेल्या बियाण्याचे नुकसान झाले. 

Web Title: Strong rainfall in Bahmane area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे