कुत्र्यांच्या हल्ल्यात विद्यार्थी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 10:35 PM2018-11-30T22:35:02+5:302018-11-30T22:35:44+5:30

कापडणे जि.प.शाळेतील घटना : उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात हलविले 

Student injured in dogs attack | कुत्र्यांच्या हल्ल्यात विद्यार्थी जखमी

कुत्र्यांच्या हल्ल्यात विद्यार्थी जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कापडणे : येथील गडीवरील जिल्हा परिषद मुलांची शाळा नंबर एक मधील इयत्ता पहिलीतील दोन विद्यार्थ्यांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याने दोन्ही विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या विद्यार्थ्यांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी जयश्री ठाकूर यांनी उपचार करुन त्यांना पुढील उपचारार्थ ििजल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले.
येथील जि.प. शाळा क्रमांक एकमधील पहिलीच्या वर्गातील जितेंद्र भाईदास पावरा व साई रवींद्र भिल हे दोन्ही विद्यार्थी कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. 
शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका मंगला मोहन पाटील यांनी सांगितले की शाळेतील विद्यार्थ्यांची जेवणाच्या सुटीनंतर सर्व विद्यार्थ्यांचे जेवण झाल्यावरती शाळा भरण्याची घंटा १ वाजून ५० मिनिटांनी झाल्यावर सर्व विद्यार्थी वर्गात जात असताना साई भिल हा विद्यार्थी स्वच्छतागृहात जात असताना कुत्र्याने अचानक हल्ला केल्याची माहिती दिली. तर दुसरा विद्यार्थी जितेंद्र भाईदास पावरा हा कुत्र्याच्या हल्ल्यातून स्वत:ला वाचवण्यासाठी शाळेबाहेर पडत असताना त्यास कुत्र्याने अक्षरशा पायदळी लोथळत व जागोजागी चावा घेत होता. प्रसंगावधान साधून येथील ग्रामस्थांनी या कुत्र्याला येथून हुसकावण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत कुत्र्याने या दोन्ही विद्यार्थ्यांच्या शरीरावर जागोजागी चावा घेऊन जखमी केले होते. या दोघी विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी जयश्री ठाकूर यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालय रवाना करण्यात आले आहे. 

Web Title: Student injured in dogs attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे